वावडे (ता. अमळनेर : राज्य परिवहन महामंडळाची मोफत बस प्रवास योजना बनावट प्रमाणपत्रांमुळे वाहकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आदेश पारित करून ७५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्यात कुठेही प्रवास योजना सुरू केली.
या योजनेमुळे राज्य महामंडळाच्या बसेसला प्रवास भाडे नसून ज्येष्ठांना मोफत प्रवास करता येईल; मात्र या योजनेच्या लाभासाठी बनावट ओळखपत्राचा वापर होत असल्याचे दिसून येत असून, वाहकांसाठी ही डोकेदुखी ठरू लागली आहे. (Carriers suffer From Fake certificates Dummy identity card for benefit of free bus travel scheme Signs of declining income Jalgaon News)
अशा मोफत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सध्या संख्या बसमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यात ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक ५० टक्के सवलतीची तर दिव्यांग बांधवांना प्रवास भाड्यात विशेष सवलत आहे. या प्रवाशांची संख्या देखील लक्षणीय आहे. त्यामुळे महामंडळाच्या बसेस हाऊसफुल्ल भरून जात असल्या तरी महामंडळाचे उत्पन्न घटत असल्याचा आरोप होत आहे.
राज्य सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे वयाची ७५ वर्षे पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्रात बसमध्ये मोफत प्रवास ही योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार महामंडळाकडून या आदेशाची अंमलबजावणी करताना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत आहे .
शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे वयाचा दाखला म्हणून आधारकार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, पॅन कार्ड यापैकी कोणताही पुरावा ओळखपत्र म्हणून वापरता येतो; मात्र ज्यांचे वय ५० ते ५५ आहे, असे प्रवासी सुद्धा बनावट ओळखपत्र दाखवून प्रवास करीत आहेत. हा प्रकार लक्षात आल्यानंतरही वाहकांना मात्र काहीही करता येत नाही.
हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....
उत्पन्न वाढीसाठी निर्णय घेण्याची गरज
अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कर्मचाऱ्यांना उत्पन्न वाढविण्याचे आदेश असतात. त्यामुळे मोफत प्रवास ही योजना वाहकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याची ओरड होऊ लागली आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
"अमळनेर तालुक्यातील सर्व प्रवासी नागरिकांना कळविण्यात येते, की मोफत प्रवास बनावट ओळखपत्राचा वापर करू नये, वापर केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल."
- इम्रान पठाण, आगार व्यवस्थापक, अमळनेर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.