जळगाव : पिंप्राळ्यातील रहिवासी वृद्धाचे मेहरूण शिवारातील मालकीचे घर परस्पर विक्री करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत वृद्धाच्या फिर्यादीवरून दुय्यम निबंधक विभागातील कर्मचारी, तलाठी यांच्यासह आठ जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Case against 8 people in mutual sale of house secondary registrar staff also suspect Jalgaon Crime News)
पिंप्राळा भागात वसंत तुकाराम भंगाळे (वय ७५) परिवारासह वास्तव्याला आहे. मेहरूण शिवारातील सर्वे क्रमांक २१/१ ‘ब’मध्ये असलेला प्लॉट नंबर १३ यातील त्यांच्या हिश्श्याची १००८ चौरस फूट जागा त्यांच्या मालकीची आहे. या जागेत एक मजली बांधकाम असून, ही जागा त्यांच्या पत्नीच्या नावे होती.
त्यांची पत्नी मृत झाल्यानंतर वारस म्हणून वसंत भंगाळे यांचे नाव लावले आहे. असे असताना मोहंमद इरफान मोहंमद तांबोळी (रा. मेहरूण) याने वसंत भंगाळे यांची पूर्वपरवानगी न घेता १६ जुलै २०१० ते २२ जुलै २०२२ या काळात कटकारस्थान करून परस्पर विक्री केली.
हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...
आठ जणांवर गुन्हा
भंगाळे यांच्या तक्रारीवरून संशयित मोहंमद इरफान मोहंमद तांबोळी, मोहंमद इदरीस मोहंमद खलील (रा. कानळदा रोड, भुसावळ), अशोक समोजी माळी (रा. संतोषी मातानगर), रमेश शंकर पाटील (रा. सदाशिवनगर, जळगाव), जगदीश दौलत पाटील (रा. रामनगर, जळगाव), सहनिबंधक कार्यालयातील दस्त नोंदणी करणारे कर्मचारी, मंडलाधिकारी राजेश भंगाळे आणि मेहरूण शिवारातील तलाठी राजीव बाऱ्हे या आठ जणांविरोधात जळगाव शहर ठाण्यात गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल झाला. हवालदार रवींद्र सोनार तपास करीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.