Jalgaon Crime : शहरात ‘ईद-ए-मिलाद’निमित्त काढण्यात आलेल्या जुलूसमध्ये चिथावणीखोर व धार्मिक तेढ निर्माण होईल, अशाप्रकारच्या विविध घोषणा दिल्याच्या आरोपावरून पोलिस ठाण्यात एका माजी नगरसेवकासह ३९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुलूसमध्ये देण्यात आलेल्या आक्षेपार्ह घोषणांबाबत चौकशी करून संबंधितांविरोधात गुन्हा नोंदवून कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी विविध हिंदू संघटना तसेच राजकीय पक्षांच्यावतीने तहसीलदार कार्यालय व पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला होता. (case filed against 39 people for making provocative announcements jalgaon crime news)
शहरात काढलेल्या जुलूसमध्ये काही समाजकंटकांनी रस्त्यावर विशिष्ठ ठिकाणी थांबून आक्षेपार्ह अशा घोषणा दिल्यामुळे शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. पांडववाडा संघर्ष समितीचे प्रमुख प्रसाद दंडवते यांच्या निवासस्थानासमोर काठ्या आपटून तसेच त्यांच्या घरावर बाटल्या फेकून चिथावणीखोर घोषणा दिल्या होत्या.
तसेच प्रसाद दंडवते यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने आक्षेपार्ह घोषणा देऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे संतप्त झालेले हिंदू संघटनांचे पदाधिकारी तसेच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून संबंधित समाजकंटकांविरोधात कडक कारवाईची मागणी केली होती.
याबाबत पांडववाडा संघर्ष समितीचे प्रमुख प्रसाद दंडवते यांनी दिलेल्या तक्रारीवरून माजी नगरसेवक असलम रशीद पिंजारी, त्याचा भाऊ साहिल पिंजारी, जमीरखान सलीम खान, सलमान पठाण, मोहसीन पिंजारी, शाहरुख इस्माईल पिंजारी, कामिल पिंजारी, शाहरुख पठाण, मोहसीन अजित पिंजारी, जमील शब्बीर पिंजारी, समीर शरीफ पिंजारी, शोएबखान फिरोजखान पठाण, समीर मेहमूद पिंजारी, इमरान सय्यद, राहीनशेख रशीद शेख, सलीम पिंजारी, जुबेर पिंजारी, परवेज पिंजारी, आवेश पिंजारी, लड्डू शकील पिंजारी, साहिल जहांगीर पिंजारी, इबा बशीर पिंजारी, अबरार पठाण, उस्मान पठाण, वासिम पिंजारी, फारुख शेख, समीर शेख नुरा, यासीन खान, सादिक पिंजारी, रमजान पिंजारी, फैझल मेहमूद पिंजारी, जाकीर खान, अकील (पूर्ण नाव माहित नाही), भय्या रशीद पिंजारी हकीम पठाण, इरफान शेख, मजहर खान (सर्व रा. एरंडोल) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.