Jalgaon Crime News : चिंग्या टोळी-माने बंधूविरुद्ध गुन्हा दाखल; पिस्तूल काडतुसांसह संशयित गजाआड

case filed against Chingya gang Mane brothers jalgaon Crime News
case filed against Chingya gang Mane brothers jalgaon Crime Newsesakal
Updated on

Jalgaon Crime News : शहरातील कानळदा रोडवरील के. सी. पार्क परिसरात खंडणी उकळण्यावरून दोन गटांत गुरुवारी (ता. २७)परस्परांविरुद्ध गोळीबार झाल्याची घटना घडली होती. चिंग्या टोळी व वाळू व्यावसायिक माने गटातर्फे एकमेकांच्या घरांवर हल्ले करून दगडफेक करण्यात आली होती.

शुभम माने याच्या घरावर हल्ला झाला, त्या वेळी एकमेकांच्या दिशेने गोळीबार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, परस्परांविरुद्ध प्राणघातक हल्ला प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दोन्ही गटांतील आठ संशयितांना अटक करण्यात आली. न्यायालयाने संशयितांना पोलिस कोठडी सुनावली.

कानळदा रोडवरील के. सी. पार्क येथे शुभम अशोक माने हा आपला भाऊ मयूर, आई-वडील आणि परिवारासह वास्तव्याला आहे. त्याच्याकडे चिंग्या टोळीकडून सतत खंडणीची मागणी करण्यात येत होती. (case filed against Chingya gang Mane brothers jalgaon Crime News)

यावरून मयूर माने यांचे आणि चेतन ऊर्फ चिंग्या सुरेश आळंदे याचे साथीदार यांच्यात वाद सुरू होता. या आधी याच टोळीने चिंग्याला जेलमधून सोडण्यासाठी खंडणीची मागणी करीत धमकावले होते. एक-दोन वेळेस शुभम माने याने पैसे दिलेही होते. मात्र, परत-परत पैशांची मागणी होत असल्याने त्याने नकार दिला.

त्यावरून गुरुवारी रात्री मयूर माने हा आपल्या परिवारासह घरी असताना सात ते आठ तरुणांनी घरासमोर येत शिवीगाळ करीत दगडफेक केली. त्यामुळे माने कुटुंबीय घराचा दरवाजा बंद करून आत गेले. टोळीकडून दगडफेक व गोळीबार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

परस्परविरोधी तक्रारीत शहरातील संत मीराबाईनगरात चेतन रमेश सुशीर हा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. चेतनची गेल्या काही वर्षांपासून शुभम माने याची ओळख आहे. सात महिन्यांपूर्वी शुभम याने चेतनकडे उसनवारीने पैसे मागितले होते. जास्त पैसे मिळतील, या उद्देशाने चेतन सुशीर आणि उमाकांत दत्तात्रय धोबी यांनी मिळून ८० हजार रुपये दिले.

त्यानंतर चेतन आणि उमाकांत यांनी दिलेल्या पैशांची मागणी केली असता शुभम हा पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता. त्यामुळे चेतन सुशीर हा त्याचे मित्र लखन मराठे, लक्ष्मण शिंदे, नरेश शिंदे, समीर सोनार, बंटी बांदल यांना सोबत घेऊन गुरुवारी सायंकाळी शुभमच्या घरी आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

case filed against Chingya gang Mane brothers jalgaon Crime News
Mumbai Crime News: कोण आहे गँगस्टर छोटा शकीलचा शूटर?, २५ वर्षांनंतर ठाण्यात अटक

त्या वेळी पैशांची मागणी केली असता शुभमने शिवीगाळ केली. त्यानंतर दोन्ही गट समोरासमोर येऊन दोन वेळा गोळीबार करण्यात आला. सर्व जण जीव वाचवून पळत सुटल्याचे चेतन याने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

आठ संशयित असे

पहिल्या फिर्यादीनुसार लखन ऊर्फ गोलू दिलीप मराठे (रा. शिवाजीनगर), लक्ष्मण शिंदे (रा. शिवाजीनगर), नरेश शिंदे (रा. शिवाजीनगर), उमाकांत दत्तात्रय धोबी (रा. संत मीराबाईनगर), समीर शरद सोनार (रा. फॉरेस्ट कॉलनी), राजेश ऊर्फ बंटी सदाशिव बांदल (रा. उस्मानिया पार्क), चेतन रमेश सुशीर (रा. मीराबाईनगर), चेतन सुरेश आळंदे ऊर्फ चिंग्या (रा. तुकारामवाडी) आणि महेश मराठे (रा. शिवाजीनगर, हुडको) यांच्याविरुद्ध, तर दुसऱ्या फिर्यादीवरून शुभम अशोक माने आणि मयूर अशोक माने (दोघे रा. कानळदा रोड, जळगाव) यांच्याविरोधात प्राणघातक हल्ला, बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंग्या ऊर्फ चेतन आळंदे वगळता आठ संशयितांना अटक करण्यात आली.

चिंग्याभाई जेलमधून चालवितो टोळी

चिंग्या याने पाच साथीदारांसह १४ मे २०१५ ला चंद्रकांत पाटील याचा खून केला हेाता. या खुनाच्या गुन्ह्यात चिंग्यासह बोबड्या ऊर्फ गोल्या ऊर्फ लखन मराठे, सनी ऊर्फ चालीस पाटील, ललित ऊर्फ सोनू चौधरी, सागर पाटील अशा पाचही संशयितांना नोव्हेंबर २०१९ मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

case filed against Chingya gang Mane brothers jalgaon Crime News
Jalgaon Crime News : बॅरेकमधील कैद्यावर सामूहिक अत्याचार; नकार दिल्याने गळा कापण्याचा प्रयत्न

लक्ष्मण शिंदे हा पुराव्याअभावी सुटला होता. या टोळीविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, पोलिसांना मारहाण, कारागृहात असताना खंडणी वसुलीसह इतर गुन्हे दाखल आहेत. नुकतीच सहा महिन्यांपूर्वी जन्मठेपेच्या गुन्ह्यातून जामीन मिळाल्यावर असोदा येथे गोळीबाराची घटना घडली. त्या गुन्ह्यात चिंग्या कारागृहात असून, त्याची टोळी बाहेर दहशत माजवत आहे.

हुशारी नडली

गोळीबाराची घटना घडल्यावर शुभम आणि मयूर माने यांनी आमच्या घरावर हल्ला व गोळीबार झाल्याची तक्रार शहर पोलिसांत नोंदवली. गुन्ह शाखेचे निरीक्षक किशन नजन पाटील यांनी तक्रारीनुसार तीन संशयितांना रात्रीच ताब्यात घेत पाहुणचार केला.

घडल्या प्रकाराबाबत त्यांनी हकीकत सांगितल्यावर माने बंधूंना बोलावण्यात येऊन त्यांना पोलिस प्रसाद दिल्यावर त्यांनी आम्हीही गोळीबार केल्याचे कबूल केले. माने याच्या घरातून आणि चिंग्या टोळीकडून प्रत्येकी एक गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले आहेत.

case filed against Chingya gang Mane brothers jalgaon Crime News
Jalgaon Crime News : अनाथांच्या बालगृहातील अल्पवयीन मुलींवर अत्याचार; एरंडोल तालुक्यातील प्रकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.