पाचोरा (जि. जळगाव) : वरसाडे प्र. पा. (ता. पाचोरा) येथील ग्रामसेवक (Gram Sevak) व सरपंचांच्या पतीने सहा हजारांची लाच (Bribe) घेतल्याप्रकरणी जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (Bribery Prevention Department) त्यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात लाचखोरीचा गुन्हा दाखल केला आहे. (Case filed against Sarpanch along with Gram Sevak taking bribe Rs 6000 Jalgaon Crime News)
याबाबत तक्रारदाराने तक्रार दिली, की वरसाडे प्र. पा. (ता. पाचोरा) येथे नियुक्तीस असलेले ग्रामसेवक काशिनाथ राजधर सोनवणे (वय ५२) यांच्याकडे ग्रामग्रामपंचायत अंतर्गत केलेल्या रोजगार हमी योजनेवर रोजगार सेवक म्हणून केलेल्या कामाचे मानधन धनादेशावर सही करण्याची विनंती केली असता, त्यांनी स्वतःसाठी व तटस्थ व्यक्ती सरपंचपती शिवदास भुरा राठोड (वय ६७) यांच्यासह सहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती चार हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. तक्रारदाराने लगेचच जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करून न्यायाची मागणी केली. केलेल्या तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचला.
त्यानुसार, तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने ग्रामसेवक काशिनाथ सोनवणे व सरपंचपती शिवदास राठोड यांना रंगेहात पकडले. ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलिस अधीक्षक एन.एस. न्याहळदे, पोलिस अधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाटील, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलिस एन. एन. जाधव, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहिरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, मनोज कोळी, जनार्दन चौधरी, सुनील शिरसाट, प्रवीण पाटील, महेश सूर्यवंशी, नासीर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदीप पोळ यांच्या पथकाने केली. यामुळे पंचायत समिती प्रशासन क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.