खऱ्या उमेदवाराच्या नावाने सादर केली खोटी कागदपत्रे; दोघांविरुद्ध गुन्हा

चोरवड विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक होत असून, यात दोन्ही प्रतिस्पर्धी गट समोरासमोर उभे आहेत.
Fake Documents
Fake Documentsesakal
Updated on

पारोळा (जि. जळगाव) : चोरवड (ता. पारोळा) येथे विकास संस्थेच्या निवडणुकीत खऱ्या उमेदवाराच्या नावाने खोटी कागदपत्रे तयार करून त्याच्या माघारीसाठी अर्ज सादर करणाऱ्या दोघांविरुद्ध निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

चोरवड विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक होत असून, यात दोन्ही प्रतिस्पर्धी गट समोरासमोर उभे आहेत. यात जोरसिंग वंजारी (रा. चोरवड) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सोमवारी (ता. १३) लेखा परीक्षण विभागात कौतिक पाटील (रा. महिंदळे, ता. भडगाव) याच्यासह एका अनोळखीने निवडणूक निर्णय अधिकारी योगेश पाटील यांच्याकडे जोरसिंग वंजारी यांच्या नावाचे बनावट आधारकार्ड तयार करून व खोटा अंगठा ठेवून माघारीसाठी अर्ज दिला. मंगळवारी (ता. १४) जोरसिंग वंजारी कार्यालयात आले असता, ही बाब उघडकीस आली. जोरसिंग वंजारी यांनी उमेदवारी अर्जावर सही केली होती. तर माघारीच्या अर्जावर त्यांचा अंगठा ठेवला होता. शिवाय त्यांचे आधारकार्डही बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे जोरसिंग वंजारी यांनी स्वतः माघारीसाठी अर्ज दिला नसताना त्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे सादर करून अर्ज देणाऱ्या कौतिक पाटील व त्याच्यासोबत आलेल्या अनोळखीविरोधात पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागूल तपास करीत आहे.

Fake Documents
येता पिवळे पाणी, कळवा ‘व्हॉल्व्हमन’ला तत्पर : जळगाव महापालिका
Fake Documents
नोकरीचे आमिष दाखवत ‘बंटी-बबली’ने लाटले साडेतीन लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.