जळगाव : औद्योगिक वसाहत (Industrial Area) परिसरातील अयोध्यानगर परिसरातून वाळूची चोरटी (sand Stollen) वाहतूक करून नेणारा ट्रक (Truck) पोलिसांनी अडवला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Case filed against truck driver owner in stolen sand transport case Jalgaon Crime News)
जळगाव शहरातील अयोध्यानगर भागातून (एमएच १९ झेड ५२४८) या क्रमांकाच्या मालवाहू ट्रकमधून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली, त्यानुसार त्यांनी कर्मचाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या. सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, दीपक चौधरी, सचिन मुंढे, यांच्या पथकाने सोमवारी (ता. २३) अयोध्यानगर परिसरात सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत चालकाला वाळू वाहतुकीचा परवाना विचारला असता, त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले.
वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याने डंपरवरील चालक पवन सोनवणे (वय २१, रा. बांभोरी, ता.धरणगाव) यास ताब्यात घेतले असून वाळू वाहतुकीचे वाहन मुकेश साळुंखे (रा. बांभोरी प्र.चा., ता.धरणगाव) यांच्या मालकीचे असल्याची कबुली चालकाने दिली आहे. त्यानुसार डंपरसह ६ हजार रुपये किंमतीची वाळू पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी पोलिस नाईक चंद्रकांत पाटील यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.