Jalgaon Crime News : पळासखेडेचे तत्कालीन ग्रामसेवक, महिला सरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल

२ लाख ६४ हजार रुपयांचा गैरव्यवहार केला म्हणून तत्कालीन महिला सरपंचासह तत्कालीन दोन ग्रामसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल.
crime
crimeesakal
Updated on

Jalgaon Crime News : पळासखेडे (ता. भडगाव) येथे शासनामार्फत मंजूर शौचालयाचा तीन लाभार्थींना दुबार लाभ व १९ लाभार्थींना मंजूर शौचालय बांधकाम करून न देता २ लाख ६४ हजार रुपयांचा गैरव्यवहार केला म्हणून तत्कालीन महिला सरपंचासह तत्कालीन दोन ग्रामसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील पळासखेडे ग्रामपंचायतीत २२ जुलै २०११ ते १० जानेवारी २०२० या कालावधीत शासनामार्फत गावातील लाभार्थीसाठी २९ शौचालय बांधकाम करण्यास परवानगी देण्यात आली होती. (case has filed against village sevak female sarpanch of Palaskhede jalgaon crime news)

crime
Nashik Crime News : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोन्याची पोत खेचली; संशयित कारमधून झाले पसार

यात तत्कालीन ग्रामसेवक जिभाऊ सुकदेव पाटील (कार्यकाळ २२ जुलै २०११ ते ४ डिसेंबर २०१७), तत्कालीन ग्रामसेवक भास्कर दौलत बागूल (कार्यकाळ ४ डिसेंबर २०१७ ते १० जानेवारी २०२०), तत्कालीन सरपंच मंगलकोर भगतसिंग पाटील, (कार्यकाळ १० सप्टेंबर २०१५ ते २०२०)

यांनी संगनमताने शासनाकडून २९ शौचालय बांधकाम परवानगी असताना १९ लाभार्थींचे शौचालयाचे बांधकाम न करता व ३ लाभार्थींना दुबार लाभ देऊन प्रत्येकी १२ हजार रुपये प्रमाणे एकूण २ लाख ६४ हजार रुपयाचा गैरव्यवहार करून शासनाची फसवणूक केली.

अशी तक्रार पंचायत समितीचे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी अशोक खैरनार यांनी दाखल केली. त्यावरून तत्कालीन ग्रामसेवक जिभाऊ पाटील, तत्कालीन ग्रामसेवक भास्कर बागूल, तत्कालीन सरपंच मंगलकोर पाटील यांच्याविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस कर्मचारी संजय पाटील तपास करीत आहेत.

crime
Thane Crime: मातेची फसवणूक करून दीड महिन्याच्या बाळाची केली खरेदी; वाचा काय आहे छत्तीसगड कनेक्शन?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.