Jalgaon Crime News : बँकेच्या लॉकरमधील सोन्याचे दागिने काकाने हिसकवले

Crime
Crimeesakal
Updated on

Jalgaon News : दिवंगत नगरसेवक नरेंद्र भास्करराव पाटील यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या नावे असलेल्या बँकेच्या लॉकरमधील १२ लाख ४० हजारांचे सोने, दस्तऐवज सख्ख्या काकाने हिसकावून घेत मारहाण केल्याप्रकरणी जिल्‍हापेठ पोलिसांत जबरी लुटीचा गुन्हा दाखल होऊन ॲड. विजय भास्कर पाटील यांच्यासह एकाला अटक करण्यात आली आहे. (case of robbery has been registered in police after uncle snatched gold and documents worth 12 lakh from the bank locker jalgaon crime news)

जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात पियुष नरेंद्र पाटील (वय-२६, रा. दीक्षितवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पियुषचे वडील नरेंद्र पाटील यांचे निधन (वर्ष-२०१८) झाल्यानंतर त्यांच्या नावे असलेल्या बँकेतील लॉकर बंदच होते. त्या लॉकरमध्ये पियुषच्या आईचे दागिने ठेवण्यात आले होते.

न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पियुष हा काका संजय भास्कर पाटील यांच्यासोबत बँकेत गेला. कागदपत्रे दिल्यानंतर (ता.११ ऑक्टोबर २०२२) रोजी दुपारी १२ लाख ४० हजार रुपये किंमतीचे दागिने व महत्त्वाची कागदपत्रे, दस्तऐवज त्यांनी घरी आणले. घरी परतल्यावर संजय पाटील यांनी खालच्याच मजल्यावर पियुषला चहा पेण्यासाठी बोलावून बसवले. तेव्हाच त्याच्या हातून दागिने आणि दस्तऐवज असलेली पिशवी हिसकावून घेत मारहाण करण्यात आली.

दागिन्यांशी तुमचा काही संबंध?

काका-पुतणे घरी परतल्यावर घराच्या तळमजल्यावर राहत असलेले मोठे काका ॲड. विजय भास्कर पाटील, संजय भास्कर पाटील, मनोज भास्कर पाटील, सुहास वसंत चौधरी, यश सुहास चौधरी, सारंग सुहास चौधरी, नरेंद्र गुलाबराव गांगुर्डे, रागिणी सुहास चौधरी, शैलजा नरेंद्र गांगुर्डे अशांनी बोलण्याचा बहाणा करून ॲड. विजय पाटील यांनी पियुष जवळ असलेली पिशवी हिसकावून घेत त्याला मारहाण केली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Crime
Jalgaon Crime News : जोरात गाणे वाजविण्याच्या कारणावरून खून...! भिल्ल समाज आक्रमक

मारहाण होत असताना, पियुषची आई ज्योती धावून आल्यावर त्यांनाही अश्लील शिवीगाळ करून पिटाळून लावले. तसेच या दागिन्यांशी तुमचा संबंध नाही, दागिने विसरुन जा. तसेच पोलिसांत तक्रार देऊ नये यासाठी धमकावले. अखेर सहा महिन्यानंतर पियुष पाटील याने बुधवारी (ता.२६) रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.

तिघे ताब्यात, सहा फरार

गुन्हा दाखल होताच, स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने नियोजनबद्धरित्या दीक्षितवाडीतील पाटील यांच्या घरावर अचानक धडकत ॲड. विजय भास्कर पाटील सह दोघांना ताब्यात घेतले असून उर्वरीतांमध्ये संजय भास्कर पाटील, मनोज भास्कर पाटील, सुहास वसंत चौधरी, यश सुहास चौधरी, सारंग सुहास चौधरी, नरेंद्र गुलाबराव गांगुर्डे, रागिणी सुहास चौधरी, शैलजा नरेंद्र गांगुर्डे अशांच्या नावाचा समावेश आहे. जिल्हापेठ त्यांचा शोध घेत आहे.

Crime
Jalgaon Unseasonal Rain : जामनेर तालुक्यात वादळी तडाखा; ज्वारी, मका, बाजरीसह पिकांचे नुकसान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.