Jalgaon Crime News : कत्तलीच्या उद्देशाने उंटांची तस्करी; वरणगावात तिघांवर गुन्हा दाखल

Crime News
Crime Newsesakal
Updated on

Jalgaon Crime News : येथून जवळच असलेल्या तापी नदीजवळील हतनूर गावी वरिष्ठांच्या आदेशानुसार सण, उत्सवानिमित्त बुधवारी (ता.२१) रात्री नाकाबंदी करण्यात आली होती.

दरम्यान, रात्री दहाच्या सुमारास मध्य प्रदेशातून आलेल्या संशयास्पद वाहनाची पोलिसांनी तपासणी चौकशी केली असता १२ उंटांची अवैध वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले. (case registered against 3 persons in Warangaon for smuggling camels for purpose of slaughter jalgaon crime news)

हे उंट मध्य प्रदेशातून मालेगावला नेण्यात येणार होते. पशुसंरक्षण कायद्यांतर्गत १७ लाख रुपये किमतीचे हे उंट गोशाळेत रवाना करण्यात आले आहे. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उंटांच्या तस्करीमागे आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सण, उत्सवानिमित्त कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये, या दृष्टीकोनातून वरणगाव पोलिस ठाण्यातर्गत सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिषकुमार आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठांच्या आदेशाने तापी नदीपट्टयात हतनूर गावाजवळ नाकाबंदीचे आदेश आहेत.

दरम्यान, बुधवारी (ता. २१) रात्री दहाच्या सुमारास मध्य प्रदेशातून हतनूर (वरणगाव) मार्गे एका लाल रंगाच्या टाटा कंपनीच्या टेम्पोमध्ये (क्रमांक सीजी ०४, एनएस.२००५) मध्ये १२ उंट मालेगाव येथे नेण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिषकुमार आडसूळ यांना मिळाली होती. याप्रसंगी रात्री दहाच्या सुमारास त्यांनी संशयास्पद वाहन थांबवून चौकशी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime News
Crime news : संभाजीनगर हादरलं! विवाहित महिलेवर तीन सख्ख्या भावांचा सामूहिक बलात्कार

१२ जिवंत उंट व एक मृत उंट वाहनासह ताब्यात घेऊन पोलिस कर्मचारी प्रवीण युवराज पाटील यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिस ठाण्यात चालक संतोषकुमार भगीरथ वर्मा (वय ५३, रा. आगरा पडाना, ता. सारंगपूर, जि. राजगड, मध्य प्रदेश), दुसरा चालक मुकेश नायर (वय ५०, रा. मुकटी हसलपूर, इंदूर मध्य प्रदेश), कार्तिक कैलास वर्मा (वय २५, रा. गिंदोरी, राजगड, मध्य प्रदेश) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी अंदाजे १७ लाख रुपये किमतीचे १२ उंट जळगाव येथील गोशाळेत रवाना केले आहेत.

उंट तस्करीचे रॅकेट सक्रिय

राजस्थान सरकारने उंट हा अतिसंरक्षित प्राणी घोषित केला आहे. उंटांच्या संरक्षणासाठी राजस्थान सरकारने २०१५ मध्ये कायदा पारित केला आहे. तरीही दरवर्षी राजस्थानातून शेकडो उंटांची विविध राज्यांमध्ये कत्तलीसाठी तस्करी केली जाते. फूड अ‍ॅण्ड सेफ्टी स्टँडर्डस् अ‍ॅक्ट नुसार उंटाचे मांस अखाद्य घोषित करण्यात आले आहे.

भारतीय पशू कल्याण मंडळाने १४ ऑगस्ट २०१७ पासून तसे परिपत्रक देखील जारी केले आहे. तरीही उंटाचे मांस भक्षण केले जाते. त्याच्या कातडीचेही विविध उपयोग आहेत. त्यामुळे उंटांना मोठी मागणी आहे. या अवैध व्यवसायात दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती प्रभारी पोलिस अधिकारी आशिषकुमार आडसूळ यांनी दिली असली तरी वरणगाव पोलिसांच्या कारवाईत १२ उंटांची सुटका केली.

Crime News
Jalgaon Crime News : भोकर गावात 65 किलो गांजासह एकाला अटक; मध्य प्रदेशातून गांज्याची तस्करी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.