Jalgaon Crime News: ‘एटीएम’साठीच्या 64 लाखांवर डल्ला; ऑडिटरसह चाळीसगावच्या चौघांना अटक

ATM Theft
ATM Theft esakal
Updated on

Jalgaon Crime News: बँकांच्या ‘एटीएम’मध्ये भरण्यासाठी दिलेल्या रकमेतून वेळोवेळी थोडी-थोडी रक्कम परस्पर काढून तीन संशयितांनी तब्बल ६४ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी येथील पोलिसांत चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

चार संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे ज्या ऑडिटरच्या लक्षात ही बाब आली, त्यालाही तिघांनी सहभागी करू घेत त्याचा वाटा वेळोवेळी दिल्याचे समोर आले. (case registered against 4 for embezzlement of 64 lakh atm money jalgaon crime news)

पोलिसांनी सांगितले, की शहरात, तसेच तालुक्यांत असलेल्या ‘एटीएम’मध्ये पैसे भरण्याची जबाबदारी बँकेने ‘सेक्यूर व्हॅल्यू इंडिया लिमिटेड’ या खासगी कंपनीला दिली आहे. या कंपनीचे कस्टोडीयन कर्मचारी संशयित आरोपी प्रवीण देवीदास गुरव, दीपक भिकन पवार (दोघे रा. पाटणादेवी रोड, आदित्यनगर, चाळीसगाव) व राजेंद्र वाल्मीक चौधरी (रा. नारायणवाडी, चाळीसगाव) यांनी त्यांना ‘एटीएम’मध्ये भरण्यासाठी दिलेली रक्कम ‘एटीएम’मध्ये पूर्ण न भरता त्यातून वेळोवेळी थोडी-थोडी काढली.

असा एकूण ६४ लाख ८२ हजार २०० रुपयांचा त्यांनी अपहार करून कंपनीचा विश्वासघात केला. एवढेच नव्हे, तर ऑडिटर चंद्रशेखर एकनाथ गुरव यांना ऑडिटदरम्यान हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी कंपनीच्या तो निदर्शनास आणून न देता खोटा ऑडिट अहवाल सादर करून बॅंकेच्या पैशांचा अपहार करणाऱ्या दोघांना मदत केली.

ATM Theft
Jalgaon Crime News : मुलास औषध दिले नाही म्हणून पत्नीला मारहाण

त्यामुळे त्यांनीही कंपनीची फसवणूक केली. हा प्रकार संबंधित कंपनीच्या लक्षात आल्यावर कंपनीचे कर्मचारी गोरक्षनाथ पोपट डोंगरे (वय ३८, रा. नाशिक) यांनी चाळीसगाव शहर पोलिसांत तक्रार दिली.

या तक्रारीवरून पोलिसांनी सोमवारी (ता. १८) सायंकाळी साडेसातच्या सुमारास संशयित आरोपी प्रवीण गुरव, दीपक पवार, राजेंद्र चौधरी व ऑडिटर चंद्रशेखर गुरव (रा. गुजरात पेट्रोलपंपाजवळ, निवृत्तीनगर, जळगाव) अशा चौघांविरोधात कंपनीचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून चौघांना अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक सुहास आव्हाड या घटनेचा तपास करीत आहेत. चार संशयितांना येथील न्यायालयात मंगळवारी (ता. १९) हजर केले असता, त्यांना २५ डिसेंबरपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

ATM Theft
Jalgaon Crime News: कारागृहातून रजेवर सुटलेला कैदी फरार; एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.