Jalgaon Crime News : अवैध वाळूचे वाहन पकडल्याने तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करून इतरांना मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (case registered against 4 people due to tractor accident jalgaon news)
येथील तलाठी संदीप शिंदे, योगेश पाटील, प्रकाश महाजन व मधुकर पाटील या चौघांचे पथक रविवारी (ता. १९) सकाळी पातोंडा, दहिवद परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना नांद्री गावाकडून दहिवदकडे निळ्या रंगाचे वाळूने भरलेले ट्रॅक्टर येताना दिसले. त्यांनी ट्रॅक्टर अडवून चालक योगेश संतोष पाटील याला पोलिस ठाण्यात नेण्यास सांगितले.
मात्र, चालक योगेश पाटीलने नकार देत उलट तलाठींना शिवीगाळ सुरू केली व ‘तुम्हाला मारायला माणसं आणतो’ असे सांगून तो ट्रॅक्टर सोडून पळून गेला. थोड्या वेळानंतर भूषण उर्फ सोनू देवरे व चालक योगेश पाटील हे दोघे मोटरसायकलने (क्रमांक- एम. एच. १९, डीएम ५२८) आले आणि इतर दोन अनोळखी दुसऱ्या मोटरसायकलने (क्रमांक- एम. एच. २१ बी २९९२) आले आणि आणि तलाठींच्या पथकाला मारहाण सुरु केली.
संदीप शिंदे यांना खाली पाडून भूषण उर्फ सोनू याने चालक योगेश याला सांगितले, की घालून मारून टाका, योगेशने ट्रॅक्टर चालू केले. तेवढ्यात इतर तलाठींनी संदीप शिंदे यांना बाजूला ओढून वाचवले. भूषण व इतरांनी तलाठी पथकाच्याच काठ्या हिसकावून पथकाला मारहाण सुरू केली.
मारहाणीत शिंदे यांच्या मांडीला व गुडघ्याला तसेच हाताच्या अंगठ्याला मार लागला तर प्रकाश महाजन यांना दोन्ही पायाला व डोक्याला मार लागला. घाबरून तलाठ्यांनी पोलिसांना बोलावले असता, चारही जण पळून गेले. वाळू चोरांचे ट्रॅक्टर व गुन्ह्यात वापरलेल्या दोन्ही मोटरसायकल व वाळू असा एकूण ३ लाख ३५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तलाठी शिंदे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात भूषण उर्फ सोनू देवरे, चालक योगेश संतोष पाटील व दोन अनोळखी अशा चौघांविरुधोत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.