Jalgaon Crime News : आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी यावलला दाम्पत्यावर गुन्हा दाखल; एकास अटक

arrested
arrested esakal
Updated on

Jalgaon Crime News : तालुक्यातील वर्षी येथील रहिवासी तथा डोंगर कठोरा येथील आश्रमशाळेतील ५८ वर्षीय सफाई कामगाराने आश्रमशाळेत गळफास घेऊन केलेल्या आत्महत्येप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात एका दाम्पत्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली आहे. (Case registered against Yaval couple for abetting suicide Arrested one Jalgaon Crime News)

तालुक्यातील डोंगरकठोरा येथील आदिवासी आश्रमशाळेतील सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेले नामदेव दगडू खैरनार (वय ५६) यांनी सोमवारी (ता. ८) आश्रमशाळेतील एका खोलीच्या छतास दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली होती.

नामदेव खैरनार हे आठ वर्षांपासून डोंगर कठोरा आदिवासी आश्रमशाळेत सफाई कामगार म्हणून कार्यरत होते. नामदेव खैरनार यांचा मुलगा योगराज नामदेव खैरनार यांनी येथील पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे,

की माझे वडील नामदेव खैरनार यांच्याविरुद्ध यावल पोलिस ठाण्यात प्रमोद रघुनाथ डोंगरे व त्यांची पत्नी सुजाता रघुनाथ डोंगरे (रा. वड्री) या दाम्पत्याने विनयभंगाची खोटी तक्रार नोंदवल्याने समाजात त्यांची प्रतिमा मलीन झाल्याने त्यांनी व्यथित होऊन डोंगरकठोरा आश्रमशाळेत गळफास घेऊन आत्महत्या केली, अशा प्रकारची सुसाईड नोट त्यांनी लिहून ठेवली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

arrested
Crime News : अमरावतीत अभियांत्रिकी विद्यार्थिनीचा गळा चिरून खून; मित्र जखमी अवस्थेत...

या फिर्यादीवरून आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या दाम्पत्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित प्रमोद रघुनाथ डोंगरे हा मृत खैरनार यांचा सख्खा भाचा आहे.

गुन्हा दाखल होण्यापूर्वी त्याच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा देखील दाखल होता. त्या गुन्ह्यात प्रमोद डोंगरे याला पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे व त्याला यावल येथील न्यायालयात सह दिवाणी न्यायाधीश व्ही. एस. डामरे यांच्यासमोर हजर केले असता ११ मेपर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे तपास करीत आहेत.

arrested
Nashik Crime : कारचालकास गुंगीचे औषध देऊन लुटणार्यास अटक; शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकची कामगिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.