Jalgaon Cyber Crime : सोशल मीडिया ॲक्टीव्ह असाल तर सावधान...! तुम्हीही ठरु शकता Sextortionचे सावज...

cyber fraud
cyber fraud esakal
Updated on

Jalgaon Cyber Crime : साडेपाच लाख लोकसंख्येच्या जळगाव शहरात आणि जिल्‍ह्‍यात महाविद्यालयीन विद्यार्थीनी, व्यापारी- व्यावसायिक आणि प्रतिष्ठित व्यक्तींना सायबर गुन्हेगारांकडून गंडविण्याच्या घटना वाढत आहेत.

सोशल मीडिया ॲक्टीव्ह, ॲन्ड्रॉईड मोबाईलद्वारे संपर्कात असलेले प्रतिष्ठीत नागरिक या सायबर गुन्हेगारांचे सावज असून वेळीच खबरदारी बाळगल्यास आपण या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकण्यापासून सज वाचू शकतो. (Cases of cyber fraud by cyber criminals are on rise jalgaon crime news)

इंटरनेट- सोशल मीडिया वापराने जग छोटे खेडे बनले आहे. सेकंदात जगाच्या पाठीवर कुणालाही कुणीही संपर्क करु शकतो, आपल्या भावना व्यक्त करु शकतो, सेाबतच ऑनलाईन व्यवहारांद्वारे पैशांची देवाण घेवाण करता येते.

परिणामी सोशल मीडिया वापरतांना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा तुमचा गैरफायदा घेऊन तुमची पिळवणूक, फसवणूक होऊ शकते. तुमच्या परिचीतांमध्ये तुमची बदनामी करण्याची धमकी देऊन तुम्हाला ब्लॅकमेल केले जाऊ शकते.

कोरोना काळात वाढले सायबर गुन्हे

जर, तुमच्या व्हॉट्सअॅपवर इंटरनॅशनल नंबर्सवरून अनोळखी व्हिडिओ कॉलचा भडिमार होत असेल, तर तुम्ही वेळीच सावध व्हा.. कारण तुम्ही व्हिडिओ कॉल स्कॅमचा पुढचा बळी ठरू शकता. कोरेाना (कोविड-19) काळात अशा गुन्ह्याची प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे.

बदनामीच्या भीतीने प्रकरणे अंधारात

बदनामी आणि प्रतिष्ठेला धोका असल्यामुळे बहुतांश पीडित महिला-मुली असोत की, पुरुष पोलिसांत तक्रार करत नाहीत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

cyber fraud
Cyber Fraud Tips : तुम्हीही सायबर फसवणुकीला बळी पडला आहात ? सायबर फसवणुक टाळण्यासाठी सरकारने सांगितले उपाय

अशा फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगच्या प्रकारांना सेक्स्टॉर्शन असेही म्हणतात. कॅटफिशिंग, लोन अॅप, फेसबुक रिक्वेस्ट आणि व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल ही नेहमी वापरात आणली जाणारी सेक्स्टॉर्शन साधनं आहेत.

कॅटफिशिंग

बहुतेक सेक्सटोर्शन प्रकरणे कॅटफिशिंगद्वारे सुरू केली जातात, या प्रकारच्या ब्लॅकमेलिंगमध्ये , घोटाळे करणारे इतर कोणाची तरी, विशेषत: आकर्षक सुंदर तरुणी, श्रीमंत व्यापारी किंवा पीडितेशी संबधीत ओळखीच्या व्यक्तीसोबत तोतयागिरी करतात.

त्यांच्या सोशल साईट वरुन चोरलेले फोटो आणि त्या अधारावर बनावट प्रोफाइल आकर्षक वर्णनासह तयार करुन संबधीतांशी परिचीत-अपरिचीतांना आकर्षीत करतात.

व्हॉट्सअॅप सेक्स्टॉर्शन

मुख्यत्वे करुन फसवणूक ब्लॅकमेलींगच्या या प्रकारात पुरुषांना लक्ष्य करण्यात येते, अशा व्यक्तींना व्हॅाटसॲप व्हिडीओ कॉलींगद्वारे संपर्क करण्यात येतो. जेव्हा ती व्यक्ती कॉलला उत्तर देते तेव्हा त्यांना व्हिडिओ कॉलवर अर्धनग्न मुलगी आढळते.

cyber fraud
Cyber Fraud: खात्यात एक रुपयाही नसला तरी बसू शकतो लाखोंचा गंडा; सायबर फसवणुकीच्या 'या' प्रकारापासून वाचा

संबंधितास प्रतिसाद दिल्यास किंवा रस दाखवल्यास सायबर गुन्हेगार त्यांचा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करायला सुरवात कारतात.

तिकडून तरुणी स्वतःचे कपडे उतरवते इकडे या व्यक्तीलाही कपडे काढण्यास सांगितले जाते. मग, त्या संभाषणाचे स्क्रिनशॉट काढून परिचीतांच्या व्हॅटसॲप आणि सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली जाते.

नाहीच ऐकल्यावर मग वेळ पडल्यावर चक्क व्हिडीओ टाकून त्याची लिंक संबंधिताना पाठवून (पैसा नाही दिला तर हि लिंग सर्वदुर व्हायरल होईल. यु-टूब फेसबुकवर दिसेल) ठराविक वेळ देऊन मोठ्या रकमेची मागणी करण्यात येते.

किंवा अश्लील वेबसाइटवर पोस्ट करण्याची धमकी देऊ शकतात. डेटिंग अॅप्स आणि व्हॉट्सअॅपसह इतर व्हिडिओ कॉलिंग प्लॅटफॉर्मवरही अशा घटना सामान्य आहे.

cyber fraud
Cyber Crime : लोकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणारा ऑनलाईन 'Gold Trading' स्कॅम माहितेय?

फेसबुक सेक्स्टॉर्शन

आजकाल फेसबुकवर सेक्सटोर्शन हा सायबर गुन्हेगारांचा एक सामान्य ब्लॅकमेलिंगचा फंडा आहे. सायबर गुन्हेगार अनोळखी व्यक्तींना फ्रेंड रिक्वेस्ट किंवा डायरेक्ट मेसेज पाठवतात. संशयितांकडून पीडिताला संभाषणात गुंतवून घेतले जाते,

त्यांचा विश्वास संपादन करण्यात येवुन अश्लील कृत्याची मागणी केली जाते. एकदा पीडित व्यक्तीने अशी कृती केली अर्थात स्वतःचे कपडे काढून चित्रीत केले की, सायबर गुन्हेगार पैसे उकळण्यासाठी त्याचा शस्त्र म्हणून वापर करेल.

‘क्लोन अॅप’ सेक्स्टॉर्शन

ब्लॅकमेलिंगच्या या प्रकारात सायबर गुन्हेगार स्वत:ची ओळख अधिकारी, प्रतिनिधी किंवा नामांकित बँकांचे किंवा वित्तीय संस्थांचे एजंट म्हणून करून देतात. ते विशेष कर्ज ऑफर देतात, आणि अगदी कमी व्याजदरासह ताबडतोब हेझेल फ्री, जास्त रकमेचे कर्ज देण्याचे वचन देतात.

एकदा पीडितेने कर्जाच्या ऑफरचा लाभ घेण्यास सहमती दिली की, ते कर्जाच्या अर्जासह ऑनलाइनद्वारे पीडिताकडून आयडी, फोटो, पत्ता पुरावा, पॅन, बँक तपशील, उत्पन्न तपशील इत्यादी कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी मिळवतात.

cyber fraud
Nashik Cyber Crime : सावधान! अनोळखी व्हिडिओ कॉल टाळा; अन्यथा...

त्यानंतर ते तुम्हाला फाइल चार्जेस, रिफंडेबल सिक्युरिटी रक्कम, प्रोसेसिंग फी इत्यादी कारणांसाठी एखाद्या विशिष्ट बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगू लागतात, जर पीडिताने असे करण्यास नकार दिल्यास ते सबमिट केलेले कागदपत्रे वापरतात आणि पीडिताचे फोटो मॉर्फ करतात आणि ब्लॅकमेलिंग सुरू करतात.

अशी घ्यावी काळजी

- अनोळखी आंतरराष्ट्रीय कॉल किंवा मेसेज आणि अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट अटेंड करू नका.

- तुम्ही ऑनलाइन शेअर करत असलेल्या माहितीबाबत सावध राहा जेवढ्या कमी शेअर करा.

- कर्ज किंवा इतर आर्थिक क्रियाकलापांसाठी नेहमी खऱ्या स्त्रोताकडे जा.

- तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध गोपनीयता सेटिंग्ज वापरा.

- प्रोफाइल तयार करताना टोपणनाव वापरा हे स्कॅमरना तुमची वैयक्तिक माहिती शोधणे आणि तुमच्या मित्र आणि कुटुंबाबद्दल तपशील उघड करणे आव्हानात्मक आणि कठीण होईल.

cyber fraud
Cyber Crime : ऑनलाइन विमानाचे तिकीट काढणे भोवले; गुगलवर नंबर सर्च केल्यावर खात्यातून रक्कम गायब

सेक्टॉर्ट केले तर काय कराल..

जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर पोलिसांत संपर्क करा, आणि शक्य तितक्या लवकर तक्रार दाखल करा कारण यामुळे गुन्हेगारांवर कारवाई करणे अधिक सोपे होते किंवा तुम्ही www.cybercrime.gov.in वर ऑनलाइन तक्रार नोंदवू शकता.

"आपले सोशल मीडिया खाते योग्य खबरदारीसह लॉक असावे, तशी सेटिंग मोबाईल- लॅपटॉपमध्ये सोशल मीडिया अकाऊंटवर करता येते. त्यामुळे केवळ तुमचे परिचीत व्यक्तीच तुमचे फोटो-पोस्ट बघू शकतील. शक्यतो खासगीतील फोटो व्हीडीओ सोशल मिडीया साईटवर टाकू नये. कुणी गंडवण्याचा प्रयत्न करत असेल तर वेळीच सायबर पोलिसांत तक्रार द्या." - संदीप पाटील सहाय्यक पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

जळगावच्या घटना अशा

- ४ एप्रिल २०२३ : धरणगावातील प्रसिद्ध व्यापारी तरुणाकडून खंडणीची मागणी

- २४ नोव्हेंबर २०२२ : जळगावच्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत १ लाख ४० हजारांची खंडणी वसूल

- १० जानेवारी २०२३ : कासोद्यातील तरुणाला १७ हजारांत गंडवले

- २२ मार्च २०२३ : खासगी कंपनीतील कर्मचार्याला अश्लील व्हिडीयोद्वारे ब्लॅकमेलिंग ३४ हजारांत लुबाडणूक

cyber fraud
Nashik Cyber Crime: टेलिग्रामचा पार्टटाईम जॉब पडला महागात; सायबर भामट्याने घातला 34 लाखांचा गंडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()