Jalgaon : कत्तलीसाठी जाणाऱ्या गुरांची केली सुटका

illegal transport of cattles latest crime update news
illegal transport of cattles latest crime update newsesakal
Updated on

जळगाव : गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरून गुरांची अवैधरीत्या कोंबून आणि निर्दयपणे वाहतूक (illegal Transport) करणारे वाहन एमआयडीसी पोलिसांनी पकडले आहे. वाहन चालकासह इतरांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली आहे. (Cattle released taken for slaughter jalgaon crime update News)

जळगाव-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास गस्तीवर असताना पिकअप व्हॅन (एमएच २० ईजी १६९१) मध्ये गुरांना निर्दयपणे कोंबून गुरांना कत्तलीसाठी नेत असताना आढळून आले. गुरांच्या वाहतुकीचा परवाना विचारले असता चालक शकील अहमद मसुद्दीन (वय ३२ रा. मेहरूण, जळगाव) याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

illegal transport of cattles latest crime update news
Crime Jalgaon : भवानी पेठेतील दुकान फोडून रोकड लंपास

पोलिसांनी वाहन एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणून गुरांची मालकी असलेल्यांची माहिती मागवण्यात आली. अखेर सहाय्यक फौजदार वामन महाजन यांच्या तक्रारीवरून चालक शकील अहमद मसुद्दीन याच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा संध्याकाळी दाखल करण्यात आला आहे.

illegal transport of cattles latest crime update news
जळगाव : अवघ्या 12 तासात चोरट्यांनी लंपास केल्या 3 दुचाकी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.