या पथकाडून गुन्ह्यांशी संबंधित असलेल्या मविप्रच्या संस्थेच्या कार्यालयात कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. तसेच या ठिकाणावरील कर्मचाऱ्यांसह संचालकांचे जबाब नोंदविण्यात आले.
मराठा विद्या प्रसारक संस्थेचा ताबा घेण्यासाठी, तसेच संचालकांचे राजीनामे घेण्यासाठी ॲड. विजय पाटील यांचे अपहरण करून त्यांना पुण्यातील एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवत मारहाण केल्याप्रकरणी (ता. ८ डिसेंबर २०२०) निंभोरा पोलिस ठाण्यात मंत्री गिरीश महाजन यांच्यासह २९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
हा गुन्हा पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. याप्रकरणात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेतर ‘पेनड्राइव्ह बाँब’ फोडून मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध गुन्हे कसे दाखल करून त्यांना कसे फसवले, विधान सभेचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांना कस फसवायचे आहे
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
या सर्व गोष्टींचे चित्रीकरण या पेनड्राइव्हमध्ये असल्याने तत्कालीन सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांनी रचलेला कट उधळून लावला होता. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून व्हावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
त्यानंतर राज्यात सत्तांतरण होऊन या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयचे पथक शुक्रवारी रात्री जळगावात दाखल झाले आहे.
राजकीय गोटात चलबिचल
सीबीआयच्या पथकात एसपी, डीवायएसपी, पोलिस निरीक्षक दर्जाचे प्रत्येकी एक अधिकारी आणि पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शहरातील एका शासकीय गृहात हे पथक थांबले असून, एका राजकीय गुन्ह्याशी संबंधित विविध कागदपत्रे, तसेच माहिती गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे.
सीबीआयचे पथक जळगाव धडकल्यामुळे राजकीय गोटात चलबिचल झाली आहे. सीबीआयचे पथक जळगाव आल्याच्या वृत्ताला वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, या प्रकरणात १२ जणांपैकी गोकूळ पितांबर पाटील, परवामंद साठे, वीरेंद्र भोईटे, महेंद्र भोईटे, शिवाजी भोईटे, अलका पवार, सुषमा इंगळे, जयवंतराव येवले, जयवंतराव देशमुख या नऊ जणांचे जबाब नोंदवले गेले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.