Jalgaon CCI Center : पाचोरा येथे ‘सीसीआय’चे कापूस खरेदी केंद्र सुरू; उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान

Ganesh Patil, Pramod Sonar, Rajaram Sonar, Vijay Patil, Yogesh Walnedkar etc. at the inauguration of cotton procurement center on behalf of CCI in Gajanan Ginning.
Ganesh Patil, Pramod Sonar, Rajaram Sonar, Vijay Patil, Yogesh Walnedkar etc. at the inauguration of cotton procurement center on behalf of CCI in Gajanan Ginning.esakal
Updated on

Jalgaon CCI Center : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व सीसीआयच्यावतीने गिरड रोडवरील गजानन जिनिंग प्रेसिंगमध्ये शुक्रवारी (ता. १) कापूस खरेदी केंद्राचे विधिवत उद्घाटन करण्यात आले.

यावेळी सीसीआयकडून कापसाला प्रतिक्विंटल सात हजार २० रुपयांचा भाव देण्यात आला आहे.(CCI cotton buying center starts at Pachora jalgaon news)

कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गणेश पाटील व गजानन जीनिंगचे संचालक प्रमोद सोनार यांच्या हस्ते कापसाची गाडी व काटापूजन करून कापूस हमीभावाने कापूस खरेदीस प्रारंभ करण्यात आला. कापूस खरेदी केंद्रात प्रथम आलेले कापूस उत्पादक शेतकरी आरेफाबी खाटीक (गोंदेगाव) यांचा सत्कार करण्यात आला.

या खरेदी केंद्रात सात हजार २० रुपये प्रतिक्विंटल हमीभावाने कापूस खरेदी केली जात असून, गजानन जीनिंगमधील यंत्र सामग्री अत्याधुनिक व स्वयंचलित असल्याने येथे मोठ्या गतीने खरेदी व कापूस प्रक्रिया देखील पार पडणार आहे.

या प्रसंगी सीसीआयचे योगेश वाळनेरकर, प्रमोद सोनार, राजाराम सोनार, बाजार समिती संचालक विजय पाटील, युसूफ पटेल, आर. व्ही. पाटील, व्ही. सी. पाटील, एन. एस. पवार, ए. एस. पाटील, गोपाल शर्मा, कुंदन गायकवाड , अनिल पाटील आदी उपस्थित होते. सभापती गणेश पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक सुविधा दिल्या जात असल्याचे स्पष्ट करून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या खरेदी केंद्रावर कापूस आणावा, असे आवाहन केले.

गेल्या अनेक दिवसांपासून कापूस खरेदी केंद्राची मागणी व प्रतीक्षा होती. अखेर सीसीआयने कापूस खरेदी केंद्र सुरू केल्याने कापूस उत्पादक शेतकरी आनंदले आहेत.

Ganesh Patil, Pramod Sonar, Rajaram Sonar, Vijay Patil, Yogesh Walnedkar etc. at the inauguration of cotton procurement center on behalf of CCI in Gajanan Ginning.
Jalgaon News : कापूस खरेदीसाठी ‘CCI’ खुल्या बाजारात उतरलाच नाही!

जिल्ह्यात तर केंद्रेही सुरू होणार

‘सीसीआय’ने जळगाव जिल्ह्यात इतर ठिकाणीही कापूस खरेदीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्ह्यात अकरा केंद्रे प्रस्तावित

असून, त्यापैकी शेंदुर्णी व पाचोरा येथे केंद्र सुरू झाले आहे. तसेच रावेर, जामनेर, चाळीसगाव, पहूर, जळगाव, आव्हाणे, चोपडा, बोदवड, भुसावळ येथे केंद्र सुरू होणार आहेत. संबंधित जीनिंग चालकांना नियमावलीही दिली. यंदा इतर नियम सर्वांना मान्य आहेत. मात्र जळगावऐवजी मुंबई फायर नियंत्रण बोर्डाची ‘एनओसी’ची अट योग्य नाही.

अत्यल्प पावसामुळे अद्यापही खरिपातील कोरडवाहूचा कापूस आला नाही. जो आला आहे, तो बागायती क्षेत्रातील आहे. त्यात माईच्शर (ओल) आहे. व्यापारी कापसाला सात हजार २० रुपयांचा प्रतिक्विंटल दर देत आहेत.

Ganesh Patil, Pramod Sonar, Rajaram Sonar, Vijay Patil, Yogesh Walnedkar etc. at the inauguration of cotton procurement center on behalf of CCI in Gajanan Ginning.
Jalgaon News : कापूस खरेदीसाठी ‘CCI’ खुल्या बाजारात उतरलाच नाही!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.