पारोळा : केंद्र सरकारकडुन (Central Government) दरवर्षी बागायती व कोरडवाहु पिक (crop) विमा काढला जात असतो.शेतकरी देखील या योजनेत सहभागी होवुन पिकांचा विमा काढीत असतात.एक महीन्याच्या मुदतीत शेतकरी (Farmer) विमा (Crop insurance) उतरविणेसाठी लागणारी रक्कम व कागदपत्रे सोयीस्करपणे गर्दी न करता देत असतात. यंदा मात्र केंद्र सरकारने फळबाग विम्याची मुदत 10 दिवस त्यात डाळींब पिकास ता,14 जुलै पर्यत मुदत तर खरीप हंगाम 2021 ची मुदत 1 जुलै ते 15 जुलै पर्यत म्हणजे तुटपुंजी 15 दिवसाची मुदत आहे.एवढ्या कमी कालावधीत शेतकर्यांना विमा काढणे गैरसोयीचे होत असुन केंद्र सरकारने खरीप हंगामाच्या पिकविम्याची मुदत वाढ ता,31 जुलै पर्यत करुन शेतकर्यांना दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी पालकमंत्री डॉ. सतीष पाटील (Dr. Satish Patil) यांनी माहिती दिली. (central government should extend the term of kharif season crop insurance)
पारोळा तालुक्यात मागील वर्षी खरीप हंगामात साधारणपणे 14 हजार शेतकर्यांनी कापुस,ज्वारी,मका,बाजरी,तुर,उडीद ,मुग,भुईमुग व तीळ आदी पिकांचा विमा उतरविला होता.या वर्षी देखील मान्सुनचा लहरी पणा पाहता अधिक शेतकरी पिक विमा काढण्यास इच्छुक आहेत.मात्र पिक विमा काढणेसाठी कमी कालावधी मिळाला असुन मुदत वाढ मिळाली तर निश्चितच जगाचा पोशिंदा शेतकर्यास न्याय मिळाला सारखा होईल.
आजवर मतदार संघात नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजुने प्रश्न मांडुन न्यायाची भुमिका आपण घेतली आहे.केंद्र सरकार हे दुटप्पी धोरणातुन शेतकर्यांची दिशाभुल करित आहे.अगोदरच इंधन व घरगुती गँस दरवाढीने सर्वसामान्य नागरिक होरपळला गेला असुन केंद्र सरकारने आता शेतकर्यांना पिकविम्याची कमी मुदत वाढ देवुन सापत्निक वागणुक दिल्याचे समोर येत आहे.
पवार साहेबांशी संवाद साधणार
गेल्या वर्षीचा पिकविमा अद्यापर्यत शेतकर्यांना मिळाला नाही.याबाबत केद्र सरकार कोणताही निर्णय देत नाही.मात्र प्रत्येक वेळा आवश्यक गरजांची वाढ करुन सर्वसामान्य नागरिकांची दिशाभुल करित आहे.कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असतांना पिक विम्यासाठी कमी कालावधी असल्याने शेतकर्यांची धावपळ व गर्दी होणार आहे.यासाठी शेतकर्यांचे नेते शरद पवार साहेब यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संवाद साधुन पिक विम्याची मुदत वाढ करणेबाबत संवाद साधणार असल्याचे डाँ सतीष पाटील यांनी सांगितले.
शेतकरी संकटात
मतदार संघात गेल्या 10 ते 12 दिवसापासुन पाऊस नसल्याने पिके कोमेजु लागली आहे.तर काही पिके उन्हयातच करपु लागल्याची स्थिती आहे.त्यामुळे खरीप हंगामाचे नियोजन पुर्ण कोलमडले अाहे.आधीच कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतांना आता आभाळमाया रुसल्याने शेतकर्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.वरुण राजाने आता कृपादुष्टी दाखवत एरंडोल - पारोळा मतदार संघात पावसाची आबादानी करावी असे साकडे त्यांनी परमेश्वरास घातले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.