Jalgaon News : बचतगटांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न : सीइओ अंकीत

Chief Executive Officer of Zilla Parishad Ankit speaking at Nehru Yuva Kendra's Cereal, Food Mela on Wednesday.
Chief Executive Officer of Zilla Parishad Ankit speaking at Nehru Yuva Kendra's Cereal, Food Mela on Wednesday.esakal
Updated on

Jalgaon News : केंद्र सरकारतर्फे यंदा तृणधान्य वर्ष साजरे केले जात आहे. आपल्याकडे तृणधान्याचे उत्पादन चांगले असून, त्यापासून अनेक पौष्टिक पदार्थ तयार केले जातात.

बचतगटांनी अशा पौष्टिक पदार्थांच्या उत्पादनापासून त्याचे महत्त्व देखील पटवून द्यायला हवे. (CEO Ankit statement about Efforts to give platform to saving groups jalgaon news)

बचतगटांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात आणि अधिकाधिक महिलांना रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. असे आश्‍वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी दिले.

नेहरू युवा केंद्र, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा समाजकार्य विभाग व राज्य परिवहन विभागाच्या जळगाव आगारातर्फे येथील बस स्थानकात नुकतेच तृणधान्य खाद्य मेळावा आणि नशा मुक्ती अभियान राबविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

Chief Executive Officer of Zilla Parishad Ankit speaking at Nehru Yuva Kendra's Cereal, Food Mela on Wednesday.
Jalgaon Crime News : शासकीय आवारातून वाळूचा ट्रॅक्टर पळविला; सहाय्यक तलाठी यांना धक्काबुक्की करुन चालक पसार

निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, प्रांताधिकारी महेश सुधळकर, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, विद्यापीठ समाजकार्य विभागाचे डॉ. दीपक सोनवणे, आगार व्यवस्थापक संदीप पाटील, आत्माचे निवृत्त अधिकारी अनिल भोकरे, कामगार अधिकारी कमलेश भावसार, लेखाधिकारी मिलिंद सांगळे, नरेंद्र चित्ते, सुरक्षा अधिकारी दीपक जाधव, विभागीय अभियंता निलेश पाटील, सांख्यिकी अधिकारी रविंद्र पवार आदी या वेळी उपस्थित होते.

नेहरू युवा केंद्राचे अधिकारी नरेंद्र डागर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा आणि उद्देश मांडला. डॉ. दीपक सोनवणे यांनी नशा मुक्ती या विषयावर मार्गदर्शन केले. विनोद ढगे यांनी जनजागर, पोवाडा, पथनाट्य सादर केले. जिल्हाभरातील बचत गट आणि उत्पादकांनी लावलेल्या विविध स्टॉलला अंकित यांच्यासह मान्यवरांनी भेट देऊन काही पदार्थांचा आस्वादही घेतला. लेखापाल अजिंक्य गवळी, युवा स्वयंसेवक तेजस पाटील, रोहन अवचारे, चेतन पाटील, योगेश चौधरी, हेतल पाटील, तुषार साळवे, रितेश भारंबे, अजिंक्य तोतला, जळगाव स्टार्टअप ग्रुपने सहकार्य केले.

Chief Executive Officer of Zilla Parishad Ankit speaking at Nehru Yuva Kendra's Cereal, Food Mela on Wednesday.
Jalgaon News : शिवभोजन केंद्रात अरेरावी, अस्वच्छता; 30 शिवभोजन चालकांना नोटीस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.