Jalgaon District Bank: सोसायटींच्या अनिष्ट तफावतीवरील व्याज बंद; संचालक मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Jalgaon District Bank
Jalgaon District Bankesakal
Updated on

Jalgaon District Bank : अनिष्ट तफावतीत असलेल्या जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायट्यांना व्याजाचा मोठा भुर्दंड बसत होता. त्यामुळे दिवसेंदिवस ही रक्कम वाढत जात होती. त्यामुळे या संस्थांना दिलासा देण्यासाठी जिल्हा बँकेने अनिष्ट तफावतीवर लावण्यात येणारे व्याज या वर्षापासून बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हा बँक स्थापनेपासून हा महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचे सांगण्यात आले.

जळगाव जिल्ह्यात एकूण ८७६ विविध कार्यकारी संस्था आहेत. यापैकी ५५३ संस्था अनिष्ट तफावतीत आहेत. त्याची एकूण रक्कम ६०५ कोटी १० लाख रुपये आहे. यात ५० लाखांवरील अनिष्ट तफावतीच्या २९१ संस्था आहेत. (Cessation of interest on undesirable differences of societies by Jalgaon District Central Cooperative Bank news)

त्यांची एकूण रक्कम ६४९ कोटी १३ लाख रुपये आहे. या अनिष्ट तफावतीवर जिल्हा बँकेतर्फे ११ टक्के व्याज दराचा भुर्दंड बसत होता. विविध कार्यकारी सोसायटीवरील अनिष्ट तफावतीची रक्कम दरवर्षी वाढतच होती.

त्यामुळे विविध कार्यकारी सोसायटीची थकबाकीची रक्कमही वाढत असल्याने त्यांना अडचणी निर्माण होत होत्या. जिल्हा बँकेने या सोसायट्यांवर असलेल्या अनिष्ट तफावतीच्या रकमेवर असलेले व्याजदर बंद करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाच्या सभेत ठेवला होता. अध्यक्ष संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत संचालक मंडळाने १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ अखेरचे व्याज बंद करण्यास मंजुरी दिली आहे.

संस्थांना मोठा दिलासा

ग्रामीण विकासाच्या दृष्टीने विविध कार्यकारी सोसायट्या महत्त्वाच्या आहेत. अनिष्ट तफावतीवर व्याज आकारणी होत असल्याने त्यांच्या थकाबाकीत वाढ होत होती. भविष्यात हीच आकारणी सुरू राहिल्यास अनेक सोसायट्या बंद झाल्या असत्या. पर्यायाने बँकही डबघाईस आली असती. व्याज बंद झाल्याने सोसायट्यांना दिलासा मिळणार आहे. व भविष्यात बँकेलाही फायदा होणार असल्याचे सांगण्यात आले.

Jalgaon District Bank
No Vehicle Day: महापालिकेतर्फे दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी ‘नो व्हेईकल डे’

"ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेचा कणा विविध कार्यकारी सोसायट्या आहेत. तो अधिक मजबूत व्हावा, यादृष्टीने संचालक मंडळाने अनिष्ठ तफावतीवरील व्याज आकारणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे." - संजय पवार, अध्यक्ष, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

जिल्ह्यातील अनिष्ट तफावतील संस्था

संस्था संख्या अनिष्ट तफावत

रक्कम

० ते १० लाखांपर्यंत ६३ ३२९.७२

१० ते २५ लाखांपर्यत ९५ १,५३७.०२

२५ ते ५९ लाखांपर्यंत १०४ ३,७३०.३२

५० ते ७५ लाखांपर्यंत ५८ ३,६०१.७५

७५ ते १०० लाखांपर्यंत ५३ ४,७०८.५३

१ कोटीपेक्षा जास्त १८० ४६,६०३.३२

एकूण ५५३ ६०,५१०.६६

Jalgaon District Bank
Bhusawal Central Railway : तिकीट न विकता भुसावळ रेल्वेला 60 कोटींचे उत्पन्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.