Chalisgaon Assembly Consituency : विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे असताना, महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून माजी खासदार उन्मेष पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून, या संदर्भात कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी (ता. २५) सकाळी साडेदहाला माजी आमदार राजीव देशमुख यांच्या ‘राजगड’वर होणार आहे. बैठकीत कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती पक्षाचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील यांनी दिली. (Chalisgaon Assembly Constituency unhappy NCP)