भिकन वाणी : सकाळ वृत्तसेवा
Chalisgaon Politics Update : आज जळगाव लोकसभा असो कि तत्कालीन एरंडोल लोकसभा असो या मतदार संघातून गेल्या अनेक वर्षात खासदारीकसाठी चाळीसगाव तालुका केंद्रबिंदू ठरत असल्याचे दिसून येत आहे.
पहिले खासदार हरिभाऊ पाटसकर यांच्यापासून तर आजचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील अशी नेतृत्वाची परंपरा तालुक्याला लाभली असल्याचे दिसून येत आहेत.
सुरवातीच्या काळात हरिभाऊ पाटसकर (चाळीसगाव)(केंद्रीय कायदा मंत्री), सोनुसिंग अण्णा पाटील(भऊर) (केंद्रीय गृहराज्य मंत्री) यांनी सभागृह गाजवले. (Chalisgaon is becoming the focal point for Lok Sabha MP jalgaon politics news)
त्यानंतर हातगाव(ता. चाळीसगाव) येथील भूमिपुत्र एम. के. पाटील यांना भाजपने तीन वेळा एरंडोल लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी दिली (सध्या जळगाव लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो). माजी खासदार पाटील हे सतत तीन वेळा विजयी झाल्यामुळे केंद्रात ग्रामीण विकासमंत्री पदाची संधी दिली.
त्यानंतर वडाळा (ता. चाळीसगाव) येथील जावई व पारोळा तालुक्याचे नेतृत्व ए. टी. पाटील यांना पक्षाने दोन वेळा संधी दिली. त्यांना पक्षाच्या अंतर्गत गटबाजीमुळे तिसऱ्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. त्यानंतर गेल्या लोकसभा निवडणुकीत मूळचे दरेगाव (ता. चाळीसगाव) येथील उन्मेष पाटील यांना पक्षाने संधी दिली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
भाजपने आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिलेल्या उमेदवाराचा विचार केला तर एक वेळा निवडून गेलेल्या उमेदवाराला पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नावाची चर्चा आहे. ते देखील चाळीसगाव तालुक्याचे मूळ रहिवासी आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे आतापासूनच वाहू लागले आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने वातावरण तापू लागले आहे. त्या राज्यातील फुटीच्या राजकारणामुळे राजकीय समीकरणे बदलत असून, कुठल्याही विश्लेषकाला राजकीय स्थितीचा अंदाज बांधणे कठीण बनले आहे. त्यामुळे येत्या काळात राजकारण कुठल्या दिशेला जाणार, हे पुढच्या हालचालींवरून स्पष्ट होणार, हे नक्की.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.