Jalgaon News : चाळीसगाव तालुक्यातील रस्त्यांसाठी 22 कोटी मंजूर; आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश

Mangesh Chavan
Mangesh Chavanesakal
Updated on

चाळीसगाव : पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गंत चाळीसगाव तालुक्यातील २६ किलोमीटरच्या रस्त्यांसाठी २२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीसाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. हा निधी मंजूर झाल्यामुळे तालुक्यातील रस्त्यांच्या कामांना लवकरच सुरुवात होईल.

अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकारच्या काळात पंतप्रधान ग्रामसडक योजना (टप्पा ३) रखडली होती. या कामाला शिंदे- फडणवीस सरकारने गती दिली असून अवघ्या दोन महिन्यात केंद्र शासनाच्या सहकार्याने राज्यासाठी २ हजार ३९ कोटींच्या निधीतून २ हजार ५५१ किलोमीटरच्या रस्त्यांना मान्यता मिळाली आहे.(Chalisgaon taluka twenty two crore sanctioned for roads Success in pursuit of MLA Mangesh Chavan Jalgaon News)

सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

Mangesh Chavan
Jalgaon News : पाचोरा-जामनेरदरम्यान ‘नॅरो’चे रूपांतर होणार Broad Gaugeमध्ये! 50 किलोमीटरचा फेरा वाचणार

त्यात केंद्र शासनाचा १ हजार २१८ कोटी व राज्य शासनाचा ८२१ कोटीचा सहभाग राहणार आहे. या निधीतून चाळीसगाव मतदारसंघातील पातोंडा- वाघडू- रांजणगाव- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ वरील १०.४३ किलोमीटर तसेच शिंदी- हिरापूर- अंधारी- तमगव्हाण या १५.९४ किलोमीटर रस्त्यांची कामे होतील.

हिरापूर- अंधारी- तमगव्हाण या रस्त्याला काही दिवसांपूर्वीच अर्थसंकल्पात ६ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्याची निविदा देखील निघाली आहे. मात्र, या रस्त्याची तातडीने सुधारणा होणे गरजेचे असल्याने त्याऐवजी रस्त्याचा पुढील भाग या कामात समाविष्ट करावा, अशी शिफारस आपण शासनाकडे करणार असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत दोन्ही रस्त्यांसाठी २२ कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाल्याने आमदार चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.

Mangesh Chavan
Nashik News : कसबे सुकेणेत शेतीला पुदिना पिकाचा पर्याय; पुदिना पिकाचे शेकडो एकरवर क्षेत्र!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.