Chandrakant Patil News : खडसेंकडून बदनाम करण्याचा प्रयत्न; आमदार चंद्रकांत पाटील यांचा प्रत्यारोप

Chandrakant Patil aggressive stance of MLA on school for teacher recruitment jalgaon news
Chandrakant Patil aggressive stance of MLA on school for teacher recruitment jalgaon newsesakal
Updated on

Chandrakant Patil News : आमदार एकनाथ खडसे यांनी केलेला आरोप व पत्रकार परिषदेत दिलेली माहिती दिशाभूल करणारी असून, आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा प्रत्यारोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

या संदर्भात आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, की सुरवातीला चार हेक्टरवर शेती असल्यास त्या शेतकऱ्यांचा विमा नामंजूर होत होता. परंतु चार हेक्टरवरील जमीनधारक शेतकऱ्यांना अपात्र करू नका, अशी मागणी मी केली होती.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

२०२१ मध्ये कृषी विमा कंपनी ही बजाज अलायन्स होती. चार हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना विम्यापासून अपात्र करू नका, अशी मागणी केली होती. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनाही विम्याचा लाभ झाला. त्यानंतर २०२२ -२३ मध्ये सरकारची विमा कंपनी आली. या काळात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी विम्याची नोंदणी केली.

परंतु विमाधारकांची व केळी पीक क्षेत्राची नोंदणी जास्त झाल्याने विमा प्रशासनाला त्याबाबत संशय निर्माण झाला होता. १४ जून २०२१ ला तत्कालीन तहसीलदार श्वेता संचेती असताना कर्की येथे काही शेतकऱ्यांवर विमा कंपनीचे दोन-तीन एजंट आले आणि त्यांनी तुमच्याकडे केळी पीक नसतानाही २५ हजार घेऊन पीक विमा काढून देतो, असे सांगितले.

त्यावेळेस करके येथील बाळू महाजन या शेतकऱ्यांनी तसेच काही इतर शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना हकिगत सांगून त्या एजंटला पैसे घेताना रंगेहात पकडले होते आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली होती.

Chandrakant Patil aggressive stance of MLA on school for teacher recruitment jalgaon news
Ajit Pawar : सध्या अजितदादांचं खच्चीकरण सुरू; पडळकरांच्या वादग्रस्त विधानावरून काँग्रेसचा दावा

त्यानंतर मी त्या ठिकाणी पोहोचलो. त्यामुळे स्टिंग ऑपरेशन केले, हा माझ्यावर खोटा आरोप लावण्यात आला आहे. विमा एजंटाकडून शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक होत असल्यामुळे शेतकऱ्यांनीच हे स्टिंग ऑपरेशन केले होते.

त्यात माझी कोणत्याही प्रकारची भूमिका नव्हती. केवळ लोकप्रतिनिधी या नात्याने मी त्या ठिकाणी हजर होतो. त्यानंतर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात विमा रक्कम मिळाली. विमा काढल्यानंतर कंपनीद्वारा जिओ टॅगिंग करण्यात आले होते. परंतु ही बाब शेतकऱ्यांवर अन्याय करणारी होती.

त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा माझ्याकडे तक्रार केल्यामुळे सदरची जिओ टॅगिंग संदर्भात मुख्यमंत्री तसेच पालकमंत्री यांच्याशी चर्चा करून थांबविण्यात आले होते. त्याचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळाला होता मी लोकप्रतिनिधी या नात्याने शेतकऱ्यांच्या नेहमी पाठीशी असून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केलेला आहे.

Chandrakant Patil aggressive stance of MLA on school for teacher recruitment jalgaon news
Eknath Khadse News : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या तक्रारीमुळे रखडली पीकविमा रक्कम; एकनाथ खडसेंचा आरोप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.