Chandrashekhar Bawankule: राज्यात महायुतीचे 45 खासदार निवडून येतील : चंद्रशेखर बावनकुळे

State President of BJP Chandrasekhar Bawankule speaking in a meeting held near Hanuman temple
State President of BJP Chandrasekhar Bawankule speaking in a meeting held near Hanuman temple
Updated on

Chandrashekhar Bawankule : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचंड पाठिंबा मिळत आहे. देशातील लोक मोदींच्या पाठीशी आहेत.

त्या पाठिंब्याच्या जोरावरच राज्यात महायुतीचे ४८ पैकी ४५ खासदार लोकसभेत निवडून येतील, असा विश्‍वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. येथे ‘संपर्क से समर्थन’ अभियानानिमित्त आयोजित कॉर्नर सभेला संबोधित करताना ते बोलत होते (Chandrashekhar Bawankule statement 45 Mahayuti MPs will be elected in state jalgaon news)

भाजपचे महामंत्री विजय चौधरी, खासदार उन्मेश पाटील, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा स्मिता वाघ, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर, प्रदेश सचिव अजय भोळे, पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार, भाजपचे पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, भडगाव तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, प्रदेश कार्यालय प्रमुख रवी अनासपुरे, जळगाव लोकसभा निवडणूक प्रमुख राधेश्याम चौधरी, चाळीसगाव विधानसभा निवडणूक प्रमुख घृष्णेश्वर पाटील, चाळीसगाव तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम, शहराध्यक्ष नितीन पाटील, पाचोरा शहराध्यक्ष दीपक माने, पोपट भोळे, जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील, धनंजय मांडोळे, जिल्हा उपाध्यक्षा नूतन पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले, की मी ४५ हजार लोकांना भेटलो. त्यापैकी केवळ १६ लोकच भाजपच्या विरोधात आहेत. बुधवारी (ता. २९) भडगावात वेगवेगळ्या ८६७ लोकांना भेटलो, ते १०० टक्के मोदींच्या बाजूने आहेत.

त्यांनी महिलांना ३३ टक्के आरक्षण देऊन महिलांचा सन्मान केला. या निर्णयामुळे संसदेत १९१ महिला खासदार, तर विधानसभेत १०० महिला राहतील. मोदींना हरविण्यासाठी तब्बल २८ पक्ष एकत्र आले आहेत. मात्र, जनता मोदींच्या पाठीशी आहे. त्यांचे हात बळकट करण्यासाठी आगामी लोकसभेत भाजपला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

State President of BJP Chandrasekhar Bawankule speaking in a meeting held near Hanuman temple
Chandrashekhar Bawankule News: साडेतीन लाख कुटुंबांपर्यंत भाजप पोहोचणार : चंद्रशेखर बावनकुळे

विक्रमी मतांनी निवडून येणार

चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगाव जिल्हा हा कायम मोदींच्या पाठीशी असल्याने भाजपचा खासदार विक्रमी मतांनी निवडून येईल, असे सांगितले. महामंत्री चौधरी यांनी मोदींना सर्व स्तरांतून समर्थन मिळत असल्याचे सांगितले. खासदार पाटील यांनी पंतप्रधान पीकविम्याच्या माध्यमातून जिल्ह्याला पुढच्या पाच दिवसांत ७२ कोटी रुपये मिळणार असल्याचे सांगितले.

गिरणा नदीवरील अंतिम टप्प्यात आलेल्या बलून बंधाऱ्यांना एक महिन्याच्या आत मान्यता द्या, अशी मागणी प्रदेशाध्यक्षांच्या माध्यमातून राज्य व केंद्राकडे केल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले. भाजपचे जिल्हाध्यक्ष जळकेकर यांनी प्रास्ताविक केले. यानिमित्त ‘सुपर वॉरियर्स’ची बैठक झाली. त्यानंतर तहसील कार्यालयापासून मेन रोडवर ‘रोड शो’ होऊन हनुमान मंदिराजवळ छोटेखानी सभा पार पडली.

या वेळी अयोध्येला प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून पाच हजार कार्यकर्ते जाण्याचा संकल्प करण्यात आला. बावनकुळे यांनी आमदार चव्हाण, खासदार पाटील, अमोल शिंदे यांच्यावर लोक घेऊन जाण्याची जबाबदारी सोपवली. आमदार चव्हाण यांनी आपले यापूर्वीच नियोजन झाल्याचे सांगत एक रेल्वेगाडीच घेऊन जाणार असल्याचे सांगितले. बावनकुळे यांनी रस्त्यावरील दुकानदारांची भेट घेऊन केंद्र सरकारच्या निर्णयाचे पत्रक दिले.

State President of BJP Chandrasekhar Bawankule speaking in a meeting held near Hanuman temple
Chandrashekhar Bawankule News: लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळतील 340 पेक्षा अधिक जागा : चंद्रशेखर बावनकुळे

अभियान लोकसभेसाठी अन् चर्चा विधानसभेची

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी भाषणातून पाचोरा-भडगाव विधानसभेत गेल्या वर्षी अपक्ष निवडणूक लढलेले अमोल शिंदे यांना अप्रत्यक्षपणे तयारीला लागण्याचे संकेत देण्याचा प्रयत्न केला. वास्तविक, या मतदारसंघात शिवसेनेचे किशोर पाटील हे आमदार आहेत. बावनकुळे यांच्या या विधानाने भाजप ‘एकला चलो रे’ची भूमिका घेत नाही ना? असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे. आमदार किशोर पाटील यांचे नाव टाळत भडगावचे १३२ केव्ही उपकेंद्र हे खासदार उन्मेश पाटील व आमदार चव्हाण यांची देण असल्याचे त्यांनी सांगितले.

अमोल शिंदे हे याविषयी ५० वेळा माझ्याकडे मंत्रालयात आल्याचे सांगितले. पाचोऱ्याचे माजी सभापती बन्सीलाल पाटील यांनी ‘आम्ही खासदाराला निवडून देतो, तुम्ही आम्हाला आमदारकी द्या’ असे बावनकुळे यांचे भाषण सुरू असताना सांगितले. त्यावर त्यांनी स्वत:च्या गळ्यातील गमचा काढून अमोल शिंदेच्या गळ्यात टाकला. हे अभियान लोकसभेसाठी होते; पण चर्चा मात्र विधानसभेच्या उमेदवारीबाबत झाल्याचे दिसून आले.

State President of BJP Chandrasekhar Bawankule speaking in a meeting held near Hanuman temple
Chandrashekhar Bawankule : पंतप्रधानपदी पुन्हा मोदी विराजमान : चंद्रशेखर बावनकुळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.