Jalgaon Kalbhairavanath Yatrotsav: चांदसणीला कालभैरवनाथांचा उद्या यात्रोत्सव; लाखो भाविक दर्शन घेणार

Chandsani Kalbhairavnath yatra tomorrow jalgaon news
Chandsani Kalbhairavnath yatra tomorrow jalgaon newseskal
Updated on

Jalgaon Kalbhairavanath Yatrotsav : चांदसणी (ता. चोपडा) येथील कालभैरवनाथांचा यात्रोत्सव रविवारी (ता. १७) होत आहे. या यात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.

मात्र, रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून, भाविकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे गांर्भीयाने लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. (Chandsani Kalbhairavnath yatra tomorrow jalgaon news)

चांदसणी - कमळगाव येथील कालभैरवनाथांचे मंदिर जागृत देवस्थान मानले आहे. नवसाला पावणारा अशी आख्यायिका या देवस्थानाची आहे. येथे लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. खानदेशातील मोठी यात्रा येथे भरत असते. येथूनच सर्व यात्रांची सुरवात होत असते. गेल्या आठ, दहा दिवसांपासून हॉटेल मोठमोठे पाळणे, ‘मौत का कुआ’, विविध वस्तूंची दुकाने थाटली आहेत.

एका दिवसाची यात्रा असते. मात्र यात्रोत्सवात एक दिवसात लाखो रुपयांची उलाढाल होते. बस आगारात एक दिवसाचे लाखो रुपये उत्पन्न मिळत असते. यात्रोत्सवाची पूर्ण तयारी झाली असल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रवीण सावळे, उपाध्यक्ष हरीष पाटील, सचिव गणेश पाटील, सरपंच मिराबाई भालेराव यांनी सांगितले. भाविकांचा सोयीसाठी चोपडा आगारातून जादा बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

जीवघेण्या रस्त्याकडे दुर्लक्ष

चांदसणी - कमळगावकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रुखनखेड्यापासून तर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच आजूबाजूच्या साईटपट्ट्यांची अवस्था एकदम खराब झाली आहे.

Chandsani Kalbhairavnath yatra tomorrow jalgaon news
Mhaswad Yatra : सिद्धनाथ-जोगेश्वरी देवीच्या शाही विवाह सोहळ्याला 5 लाख भाविकांची हजेरी

सुमारे सात किलोमिटरचा हा रस्ता असून, याकडे अद्यापपर्यंत कोणी लक्ष दिले नाही. यात्रोत्सवात अनेक जण दर्शनासाठी जातात. मात्र, तरीही याकडे अद्यापपर्यंत कोणीही लक्ष दिले नाही. हा रस्ता तत्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी भाविकांनी केली आहे.

पर्यटन विकासाला मिळणार चालना

चांदसणी - कमळगाव येथील काळभैरवनाथांच्या मंदिरावर भाविकांची मोठी श्रद्धा आहे. मंदिर संस्थानतर्फे परिसरात अनेक विकासकामे करण्यात आली आहेत. सभागृह, निवास खोल्या आदींची कामे पूर्णत्वास आली आहेत. मात्र, विविधांगी विकासासाठी अजूनही मोठ्या निधीची गरज आहे. शासनाने याकडे लक्ष दिल्यास पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.

मोठी आर्थिक उलाढाल

खानदेशात प्रसिद्ध असलेल्या काळभैरवनाथांच्या या एकदिवसीय यात्रोत्सवात मोठी आर्थिक उलाढाल होत असते. तसेच नवस फेडणाऱ्याची मोठी गर्दी होत असते. यात्रोत्सवात लाखो भाविकांची गर्दी होते. प्रशासनाकडूनही सर्व सुविधा पुरविण्यात येत असतात.

Chandsani Kalbhairavnath yatra tomorrow jalgaon news
Jalgaon News: जिल्ह्याचा 11 हजार कोटींचा वित्त पुरवठा आराखडा; नाबार्ड’चा उपक्रम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.