Jalgaon News : शिवाजीनगर स्मशानभूमीत अधर्वट जळालेला मृतदेह; अधिकारी सुस्त

jalgaon municipal corporation
jalgaon municipal corporationesakal
Updated on

जळगाव : शहरातील शिवाजीनगर भागातील स्मशानभूमीत (Crematorium) महापालिकेतर्फे हलगर्जी करण्यात येत आहे. मृतदेह पूर्ण जाळण्याची जबाबदारी असतानाही कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

त्यामुळे अर्धवट जळलेला मृतदेह आढळून आला. याबाबत शिवसेना विभागप्रमुख विजय बांदल यांनी तक्रार केली असून, अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.(Charred body in Shivaji Nagar crematorium Municipal Corporation ignorance jalgaon news)

शिवाजीनगर स्मशानभूमीच्या सुविधेकडे महापालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचा आरोप बांदल यांनी केला आहे. याबाबत त्यांनी म्हटले आहे, की या ठिकाणी मृतदेह जाळण्यासाठी लाकडाची सुविधा नाही. अनेकवेळा लाकडांची प्रतीक्षा करावी लागते, तसेच मृतदेह संपूर्णपणे जाळण्याची जबाबदारी महापालिकेच्या कर्मचाऱ्याची असते.

मात्र, कर्मचारी ती जबादारी पार पाडत नाहीत. याबाबत त्यांनी सांगितले, की एक मृतदेह अर्धवट जळालेल्य स्थितीत आढळून आला. नागरिकांनी आपल्याला भ्रमणध्वनीवरून त्याबाबत माहिती दिली. आपण त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली, त्या वेळी वस्तुस्थिती आढळून आली. आपण त्याचा व्हिडिओ काढून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही पाठविला आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

jalgaon municipal corporation
Jalgaon News: जळगाव तहसील कार्यालयाची सुरक्षा धोक्यात; शासकीय कारभाराचा नमुना समोर

नातेवाईक मृतदेह पूर्ण जाळण्यासाठी मनपा कर्मचाऱ्याला डिझेल आणून देतात. तरीही हा प्रकार का घडतो, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. शिवाय या ठिकाणी स्वच्छता केली जात नाही. बाकडेही तुटलेले आहेत. अंत्यविधीसीठा लाकडेही उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

jalgaon municipal corporation
Triple Talaq : पोस्टाद्वारे ट्रीपल तलाकने घटस्फोट देण्याचा प्रयत्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.