Jalgaon News : छत्रपती शिवाजी महाराज, सरदार पटेलांच्या पुतळा अनावरणास शासनाची स्थगिती

Preparations are underway for Sardar Vallabhbhai Patel's statue in the Municipal Corporation premises.
Preparations are underway for Sardar Vallabhbhai Patel's statue in the Municipal Corporation premises.esakal
Updated on

Jalgaon News : राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जळगावात रविवारी (ता. १०) होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज व सरदार वल्लभभाई पटेल पुतळा अनावरणास शासनाने स्थगिती दिली असून, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची तारीख व वेळ मागण्यात आली आहे. त्यादरम्यान कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करू नये, असे पत्र शासनाच्या उपसचिवांनी महापालिकेस पाठविल्यामुळे पेच निर्माण झाला आहे.

जळगाव महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाची सत्ता आहे, तर भाजप व शिंदे गट विरोधक आहेत. सत्ताधारी व विरोधी नगरसेवक यांच्यात तातडीची बैठक होत असून, त्यानंतरच हा पेच सुटणार आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj Sardar Patel statue unveiling suspended by government jalgaon news)

उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या पुढाकारातून मनपातर्फे पिंप्राळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला आहे, तर महापालिका प्रशासकीय इमारतीच्या आवारात सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.

...अशी आहे स्थिती

महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाच्या महापौर जयश्री महाजन आहेत, तर उपमहापौर कुलभूषण पाटील हे ठाकरे गटाचेच आहेत. पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे भूमिपूजन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. त्या वेळी त्यांनी पुतळ्याच्या अनावरणास आपण येऊ अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार उपमहापौर पाटील यांनी अवघ्या तीन महिन्यांत पुतळा उभारणीचे काम महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण केले.

त्यासाठी आवश्‍यक त्या परवानग्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ १७ सप्टेंबरला पूर्ण होत आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरणाचा शब्द दिल्यामुळे रविवारी पुतळ्याचे अनावरण करण्याचा ठरविण्यात आले. शासकीय नियमानुसार हा कार्यक्रम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तर दुसरीकडे महापालिकेच्या इमारतीच्या आवारात सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळाही महापालिकेतर्फे उभारण्यात आला आहे. त्यामुळे त्या पुतळ्याचे अनावरणही उद्धव ठाकरे यांच्या हस्ते १० सप्टेंबरला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Preparations are underway for Sardar Vallabhbhai Patel's statue in the Municipal Corporation premises.
Jalgaon News : दहीहंडीसोबत तुटली आयुष्याची दोर! हात गमावलेल्या तरुणाने कुंचल्यातून पुसल्या कटू आठवणी

महापालिकेच्या महासभेत त्याला मंजुरी घेण्यात आली. शासकीय प्रोटोकॉलनुसार करण्यासही मंजुरी देण्यात आली. पुतळा अनावरणाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौराही प्राप्त झाला आहे.

शिंदे गटाचे निवेदन

अशा परिस्थितीत शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांनी ७ सप्टेंबरला महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन दोन्ही पुतळ्याचे अनावरण शासकीय प्रोटोकॉलनुसार व्हावे, अशी मागणी केली. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच जिल्ह्यातील तिन्ही मंत्री यांची तारीख व वेळ घ्यावी, त्या तारखेलाच लोकार्पण, उद्‌घाटन सोहळा शासकीय प्रोटॉकॉलनुसार करावे, अशी मागणी केली.

शिवसेना शिंदे गटाचे गटनेते दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे, प्रतिभा देशमुख, रेश्‍मा काळे, चेतन सनकत, रेखा पाटील यांच्या त्यावर स्वाक्षऱ्या आहेत. त्यांच्या पत्रानुसार महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी शासनाकडे पत्र पाठवून मार्गदर्शन मागविले होते.

शासनाची कार्यक्रमास स्थगिती

महापालिकेच्या आयुक्तांचे पत्र शासनाला प्राप्त होताच शासनातर्फे कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आली आहे. याबाबत राज्याचे उपसचिव शंकर जाधव यांनी आज तातडीने महापालिकेस पत्र पाठविले असून, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची दोन्ही पुतळा अनावरणासाठी वेळ व तारीख घेण्याबाबत प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे.

Preparations are underway for Sardar Vallabhbhai Patel's statue in the Municipal Corporation premises.
Jalgaon Rain News : जळगावसह जिल्ह्यात ‘वरुण’कृपा; महिन्याच्या खंडानंतर पावसाचे सुखद आगमन

दरम्यानच्या कालावधीत पुतळ्यांच्या अनावारणाबाबत इतर कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करू नये, असे आपणास कळविण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे शासनाच्या या पत्रानुसार आता १० सप्टेंबरला उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणाऱ्या दोन्ही पुतळ्याच्या अनावरणास स्थगिती देण्यात आली आहे.

दोन्ही गटांची एसपींकडे बैठक

शुक्रवारी जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी व भाजपच्या नगरसेवकांची बैठक झाली. शिंदे गटाचे नगरसेवक मात्र अनुपस्थित होते. महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे सुनील महाजन, जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, तसेच भाजपचे गटनेते राजेंद्र घुगे पाटील, महानगराध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, नगरसेवक विशाल त्रिपाठी, डॉ. राध्येश्‍याम चौधरी आदी उपस्थित होते. या वेळी आयुक्त डॉ. विद्या गायकवाडही उपस्थित होत्या.

ठाकरे गट कार्यक्रमावर ठाम

शिवसेना ठाकरे गट पुतळा अनावरण करण्यास ठाम आहे. शिवसेना पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी सांगितले, की आम्ही छत्रपती शिवाजी महाराज व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यावर ठाम आहोत.

नियमाप्रमाणे अनावरण करावे : भाजप

भारतीय जनता पक्षातर्फे पुतळ्यांचे अनावरण शासकीय नियमाप्रमाणे करण्यात यावे, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.

Preparations are underway for Sardar Vallabhbhai Patel's statue in the Municipal Corporation premises.
Jalgaon News : ‘बाबा मला शिक्षण घेऊ द्या...’ मुलींनी लिहिले पत्र; पालकांना भावनिक आवाहन

सत्ताधारी, विरोधकांची बैठक

पुतळा अनावरण कार्यक्रमाबाबत सामंजस्याची भूमिका घेण्याबाबत आता सत्ताधारी व विरोधी पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक शनिवारी (ता. ९) सायंकाळी आयोजित करण्यात आली आहे. यात शिवसेना ठाकरे गट, भाजप, शिवसेना शिंदे गटाचे नेते बसून भूमिका ठरविणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता या बैठकीवरच शहरातील दोन्ही पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम अवंलबून आहे.

राजकारण करू नका; मराठा संघटनाची मागणी

दरम्यान, मराठा संघटनातर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी सुरेंद्र पाटील, प्रतिभा शिंदे, सुचिता पाटील, उपस्थित होत्या. त्यांनी सांगितले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत कोणीही राजकारण करू नये. सर्व पक्षांच्या नेत्यांनी व नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थितीत द्यावी, असे आवाहन केले आहे.

Preparations are underway for Sardar Vallabhbhai Patel's statue in the Municipal Corporation premises.
Jalgaon News : पारोळा तालुक्यात आता पाचऐवजी सात महसुली मंडळे; शेतकऱ्यांना प्रशासकीय कामात होणार फायदा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.