Chhatrapati Shivaji Maharaj Statue : शिवरायांचा अश्‍वारूढ पुतळा आज पिंप्राळ्यात; जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी

Equestrian statue to be installed at Pimprala
Equestrian statue to be installed at Pimprala esakal
Updated on

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : पिंप्राळा येथे बसविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारूढ पुतळ्याच्या परवानगीची सर्व कागदपत्रे महापालिकेतफे सादर करण्यात आली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी बसविण्यास परवानगी दिलेली आहे.

त्यामुळे शहराबाहेर असलेला पुतळा मंगळवारी (ता. ८) वाजत गाजत पिंप्राळा येथे चबुतऱ्याच्या ठिकाणी आणण्यात येणार आहे. उपहापौर कुलभूषण पाटील यांनी ही माहिती दिली. (Chhatrapati Shivaji Maharaj Statue will be brought to Pimprala today jalgaon news)

पिंप्राळा येथे महापालिकेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा बसविण्यत येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यासाठी किल्ल्याच्या आकाराचा चबुतराही उभारण्यात आला आहे. तब्बल २० फुट उंचीचा हा अश्‍वारूढ पुतळा धुळे येथील शिल्पकार सरमद पाटील यांनी साकारला आहे.

धुळे येथून पुतळा जळगावात आणण्यात आला. मात्र, पुतळा उभारणीसाठी काही कागदपत्रांची परवानगी नसल्याचे कारण देत जिल्हा प्रशासनाने तो जळगावात आणण्यास मनाई केली होती. त्यामुळे पिंप्राळा येथील शिवस्मारक समितीतर्फे हा पुतळा शहराजवळील वराड बुद्रुक या गावात सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आला होता.

सोमवारी (ता. ७) शिवस्मारक समितीची बैठक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Equestrian statue to be installed at Pimprala
Chhatrapati Shivaji Maharaj : खिळ्यांपासून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा

यावेळी महापालिकेतर्फे मंजूरीची कागदपत्रे सादर करण्यात आली. त्यानंतर हा पुतळा बसविण्यास जिल्हा प्रशासनातर्फे परवानगी देण्यात आली. मंगळवारी सकाळी दहाला हा पुतळा वराड येथून वाजत गाजत जळगावकडे आणण्यात येणार असल्याची माहिती उपमहापौर पाटील यांनी दिली.

"पिंप्राळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्‍वारूढ पुतळा उभा रहावा, हे या ठिकाणच्या नागरिकांचे स्वप्न होते. ते आपल्या प्रयत्नामुळे पूर्ण होत आहे, याचा अभिमान आहे." -कुलभूषण पाटील, उपमहापौर, जळगाव

Equestrian statue to be installed at Pimprala
Chhatrapati Shivaji Maharaj शिवरायांचे 'हे' 10 गुण जरी समजले तर आयुष्य बदलेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.