Jalgaon Election News : अत्याधुनिक तंत्रामुळे ‘इव्हीएम’ हॅक होऊ शकत नाही

जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सज्ज असून सद्या मतदारांमध्ये मतदान जनजागृती व ईव्हीएम बाबत जनजागृती नागरिकांपर्यंत केली जात आहे.
evm machine
evm machineesakal
Updated on

Jalgaon News : जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सज्ज असून सद्या मतदारांमध्ये मतदान जनजागृती व ईव्हीएम बाबत जनजागृती नागरिकांपर्यंत केली जात आहे. ‘ईव्हीएम’ मशिन हॅक होवू शकत नाही, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. (Chief Electoral Officer of state Shrikant Deshpande statement EVM cannot be hacked due to sophisticated technology jalgaon news)

जिल्ह्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व निवडणूक यंत्रणांचा आढावा घेतला जात आहे. जळगाव जिल्ह्यातही निवडणुकीच्या मतदानाची तयारी सुरू आहे. श्री. देशपांडे यांनी जिल्ह्यातील निवडणूक तयारीबाबत अधिकारी तसेच पोलिस अधिकारी यांची निवडणूक यंत्रणेची बैठक घेतली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद होते.

श्री.देशपांडे म्हणाले, की या वर्षी जगातील साठ देशात निवडणूका होत असून भारतातील होणाऱ्या निवडणुकीकडे साऱ्या जगाचे लक्ष लागून आहे. सर्वात मोठ्या लोकशाहीच्या देशात निवडणूक प्रक्रिया निपक्ष निवडणूक पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा व निवडणूक आयोग काम करत असते.

आगामी निवडणुकीची तयारी सुरू असून राज्यातील विविध जिल्ह्यांची तयारीचा आढावा घेतला जात आहे. निवडणूक वेळापत्रकापूर्वी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून काम सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील मतदानाची टक्के वाढीसाठी विशेष जनजागृती मोहीम ही तसेच ‌इव्हीएमबाबत जनजागृती फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत केली जाणार आहे.

evm machine
Jalgaon News : चहार्डीच्या महिला सरपंचावर ‘अविश्वास’; चर्चेसाठी 5 फेब्रुवारीला विशेष सभा

श्री. देशपांडे यांनी ईव्हीएम मशिन बाबत तांत्रिक माहिती दिली. यात हि मशिन वायरलेस, इंटरनेट सर्वरवर चालणारी यंत्रणा नाही म्हणून मशिन हॅक होऊ शकत नाही.

मशिनमधील चीफमध्ये एकदाच प्रोग्राम फिड केला जातो, यात बदल होऊ शकत नाही. मशिनमध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्या मशिन बंद पडते आदी तांत्रिक बाजू त्यांनी माध्यमांसमोर मांडल्या.

१७३० मतदान केंद्रावर वेबकास्टींग

जिल्ह्यात १७३० मतदान केंद्रावर वेबकास्टींग केले जाणार आहे. तसेच ४० टक्के वरील अपंग, ८० वर्षावरील वृद्धांना मतदान केंद्रावर येणे शक्य नाही त्यांना घरीच मतदान करण्याची सुविधा केली आहे. १३५ तृतीयपंथांची मतदान यादीत नोंद केल्याची माहिती श्री. प्रसाद यांनी दिली.

evm machine
Jalgaon Lok Sabha Election : अमळनेर मतदार संघात 3 लाखांवर मतदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.