CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा जळगाव जिल्ह्यातील पहिला तालुकास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ साठीचा २६ ऑगस्टला होणारा पाचोरा दौरा स्थगित झाला आहे.
नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहिती जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील व उपजिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गणेश पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे. (Chief Minister Eknath Shinde visit to Pachora postponed jalgaon news)
शासनाच्या लोककल्याणकारी योजना व व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा लाभ गरजू नागरिकांना मिळावा, यासाठी राज्य शासनाच्या वतीने राज्यभर ‘शासन आपल्या दारी’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचे आयोजन जिल्हानिहाय सुरू आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून तालुकास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम घेण्याचे नियोजन करण्यात आले होते.
जिल्ह्यातील पहिला तालुकास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम पाचोरा येथे होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार, मंत्री उदय सामंत, पालकमंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, अनिल पाटील यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री यांची उपस्थिती लाभणार आहे.
या वेळी पाचोरा व भडगाव तालुक्यातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न सुरू असलेल्या औद्योगिक वसाहत, पाचोरा येथील उपजिल्हा रुग्णालय, क्रीडासंकुल यांसह विविध विकासकामांचे देखील भूमिपूजन व उद्घाटन केले जाणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पाचोरा व भडगाव तालुक्यांतील सुमारे पंधरा हजार लाभार्थ्यांना विविध शासनाच्या योजनांचा लाभ देण्याचे नियोजन प्रशासन स्तरावर झाले असून, याबाबत आमदार किशोर पाटील व प्रांताधिकारी भूषण अहिरे यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन नियोजन केले आहे. दरम्यान, २६ ऑगस्टला होणारा कार्यक्रम स्थगित झाला असून, नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
"मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या कार्यव्यस्ततेमुळे २६ ऑगस्टला होणारा दौरा पुढे ढकलण्यात आला असून, सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात हा दौरा होऊ शकतो. सुधारित तारीख लवकरच जाहीर केली जाईल." - किशोर पाटील, आमदार, पाचोरा-भडगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.