Eknath Shinde News : मुख्यमंत्री शिंदे 3 जूनला जळगावमध्ये

CM Eknath Shinde News
CM Eknath Shinde Newsesakal
Updated on

Jalgaon News : शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यात ७५ हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना शासकीय योजनांचे लाभ देण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभाचे वाटप करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ३ जूनला संभाव्य जळगाव जिल्हा दौऱ्याचे नियोजन करण्यात येत आहे.

यासाठी जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक विभागाने लाभ देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांची निवड प्राधान्याने करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सोमवारी (ता. २२) दिल्या. (Chief Minister Shinde on June 3 in Jalgaon Government at your doorstep initiative Instructions given by District Collector in review meeting Jalgaon News)

CM Eknath Shinde News
Jalgaon News : तापी नदीत बुडून 2 तरुणांचा मृत्यू

जिल्हाधिकारी मित्तल म्हणाले, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांतील ७५ हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्याचे ध्येय आहे.

या अभियानाचे समन्वय मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रत्येक विभागाने आपल्या विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची यादी तयार करावी.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

CM Eknath Shinde News
Crime News: धक्कादायक! मांत्रिकाच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू; मुलावर भूतबाधा...

या योजनांची माहिती, योजनेच्या लाभासाठी पात्रतेचे निकष आदी माहिती सर्वसमान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावी. प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करून त्यांच्याकडून अर्ज भरून घ्यावेत व आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रत्येक विभागांच्या १०० लाभार्थ्यांना उपस्थित ठेवण्याचे नियोजन करावे. जिल्ह्यात उन्हाची तीव्रता लक्षात घेता त्यांची बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी आदी आवश्यक त्या सोईसुविधांचे नियोजन करावे.

‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत जिल्हा व तालुका स्तरावर १५ जूनपूर्वी शिबिर घेऊन नागरिकांना योजनांचा थेट लाभ प्रदान करावयाचा असल्याने सर्व विभागांनी त्यादृष्टिने परिपूर्ण नियोजन करून हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहनही श्री. मित्तल यांनी केले. निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांनी प्रास्ताविकात या उपक्रमाची व प्रत्येक विभागाने करावयाच्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली.

CM Eknath Shinde News
Crime News : मोटरसायकलला कट मारण्याच्या किरकोळ कारणावरून तरुणाचा खून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.