जळगाव : एके ४७ रायफल पाहून मुले थक्क

पोलिस स्थापनादिनी प्रदर्शन; दोन हजारांवर शालेय विद्यार्थ्यांची भेट
maharashtra police commissioner
maharashtra police commissionersakal
Updated on

जळगाव : सर्वसाधारण पिस्तुलासह ९ एमएम पिस्तूल(9mm pistol details), एके ४७(AK-47 rifle), एसएलआर रायफल, थ्री नॉड थ्री रायफल यासह पोलिस दलातील अन्य शस्त्रे पाहून विद्यार्थी अक्षरश: थक्क झाले. निमित्त होते महाराष्ट्र पोलिस दलाच्या (maharashtra police commissioner) स्थापनादिनी पोलिस दल, भवरलाल ॲन्ड कांताबाई जैन फाउंडेशन व युवाशक्ती आयोजित शस्त्रप्रदर्शनाचे.

maharashtra police commissioner
नागपूर : ज्याची भीती तेच पुढ्यात! मायलेकाला ओमिक्रॉनची बाधा

सलग सहाव्या वर्षी काव्यरत्नावली चौकात आयोजित या प्रदर्शनाला शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांतील दोन हजार १४२ विद्यार्थ्यांनी भेट दिली. या वेळी विद्यार्थ्यांनी पिस्तुलापासून एके ४७ पर्यंतची शस्त्रे हाताळली. पोलिसांनीदेखील बेवारस वस्तू आणि सदृश वस्तूंबाबत काय काळजी घ्यायला हवी याबद्दल माहिती दिली. पोलिस निरीक्षक बळिराम हिरे यांनी प्रास्ताविक केले. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी महाराष्ट्र पोलिसांचा इतिहास, कार्यपद्धती, प्रमुख उपलब्धी इत्यादीविषयी सविस्तर माहिती सांगितली. अमित माळी यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी युवाशक्ती फाउंडेशनचे विराज कावडिया, अमित जगताप, पोलिस उपअधीक्षक (गृह) विठ्ठल ससे, जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, निरीक्षक बळिराम हिरे, लीलाधर कानडे, रामदास वाकोडे, रामकृष्ण कुंभार, प्रतापराव शिकारे, राखीव पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे आदी उपस्थित होते.

maharashtra police commissioner
महिलांमध्येही रुजतेय फिटनेसची क्रेझ

विद्यार्थ्यांनी हाताळली शस्त्रे

या वेळी विद्यार्थ्यांना ९ एमएम पिस्तूल, एसएलआर रायफल, इन्सास, एके ४७, ग्लॉक, कार्बाइन, रिव्हॉल्व्हर, थ्री नॉट थ्री, पंप ॲक्शन, टिअर गॅस इत्यादी शस्त्रांची सविस्तर माहिती देण्यात आली. या वेळी श्वानपथकातील लॅबरेडॉर, जर्मन शेफर्ड, डॉबरमन ब्रीडच्या श्वानांचे विद्यार्थ्यांनी निरीक्षण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.