Chinya Jagtap Crime Case : कैदी मृत्यूप्रकरणी जेलर गायकवाड निलंबित

Crime
Crimesakal
Updated on

Jalgaon Crime News : जळगाव जिल्‍हा कारागृहात असलेला न्यायबंदी (कच्चा कैदी) चिन्या जगताप याचा कारागृह पोलिसांच्या मारहाणीत अडीच वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. (Chinya Jagtap Crime Case Jailer Gaikwad suspended in prisoner death case jalgaon crime news)

याप्रकरणी तत्कालीन कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्यासह पाच जणांवर गुन्हे दाखल झाला असून, आता गृह विभागाचे उपसचिव विनायक चव्हाण यांनी तीन दिवसांपूर्वीच जेलर पेट्रस गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

शहर पोलिस ठाण्यात दाखल मारहाणीच्या गुन्ह्यात चिन्या ऊर्फ रवींद्र जगताप जिल्‍हा कारागृहात होता. घटनेच्या दिवशी (११ सप्टेंबर २०२०) कारागृहात झालेल्या मारहाणीत चिन्या ऊर्फ रवींद्र जगतापचा मृत्यू झाला होता.

कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड, तुरुंगाधिकारी जितेंद्र माळी, कारागृह पोलिस कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील, दत्ता खोत यांनी मारहाण केल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप चिन्याची पत्नी मीना जगताप यांनी केला होता. त्यांनी पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि नशिराबादच्या पोलिस निरीक्षकांना गुन्हा नोंदवावा म्हणून निवेदन दिले होते. मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Crime
Jalgaon Crime News : स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे एकाच वेळी 3 ठिकाणी छापे

पोलिस दाद देत नाहीत, हे लक्षात आल्यावर मीना जगताप यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तिची गंभीर दखल घेत न्यायालयाने अहवाल मागितला. चिन्याचा शवविच्छेदन अहवाल आणि व्हिसेरात त्याच्या शरीरावर मारहाणीच्या २२ जखमा असल्याचे नमूद आहे. यासंदर्भात तत्कालीन तुरुंगरक्षक मनोज जाधव यांनी २६ नोव्हेंबर २०२१ ला नशिराबाद पोलिस ठाण्यात जबाब नोंदविला होता.

मनोज जाधव या घटनाक्रमाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. चिन्याला कशी मारहाण झाली, याची माहिती त्यांनी जबाबात दिली आहे. याआधीही न्यायालयीन चौकशीदरम्यान काही कारागृहबंदिंनी या पाच आरोपींच्या विरोधात जबाब नोंदविलेले आहेत. कारागृह कायद्यानुसार ही घटना गंभीर असून, पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच्या ४८ तासांच्या आत गुन्हा दाखल करायला हवा होता, मात्र तसे झाले नाही. नंतर १४ महिन्यांनी गुन्हा दाखल झाला.

आता शासनाने ६ एप्रिलला आदेश काढून पेट्रस गायकवाड याला निलंबित केले आहे. निलंबनकाळात गायकवाड याचे मुख्यालय अहमदनगर कारागृह असेल. पूर्वपरवानगीशिवाय त्याला मुख्यालय सोडता येणार नाही. रोज सकाळी व दुपारी पेट्रस गायकवाड याला हजेरी द्यावी लागणार आहे. निलंबनकाळात कुठलीही नोकरी व धंदा करता येणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे.

Crime
Jalgaon Crime News : भुसावळमधून पानमसाल्यासह हुक्का पॉर्लरचे साहित्य जप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.