चोपडा : मागील पंचवार्षिकमधील गाळप हंगामापैकी तीन गाळप हंगामात कारखान्यास ऊस घालण्याचे बंधन या जाचक अटीमुळे अनेक उमेदवारांचे अर्ज अवैध करण्यात आले आहेत. २०१४-२०१९ या मागील पंचवार्षिकमध्ये पाच गाळपपैकी कारखान्याचे दोन गाळप बंद होते. यात इतर वर्षांच्या गाळपात प्रत्यक्षात कारखानाचे गाळप उशिराने सुरू झाल्याने गाळप अतिशय कमी झाले.
ऊसपुरवठा कसा करणार? तालुक्यात ऊस भरपूर, पण कारखानाच उशिराने, अथवा बंद असेल तर ऊस कुठे देणार? यात ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांची काय चूक आहे? पण त्यांना या जाचक अटीचा फटका बसला आहे. खरे हक्कदार आहेत, मालक आहेत, असे इच्छुकांच्या न्याय्य हक्कावर पाणी फिरणार आहे. (Chopra Sugar Factory Election Application of many candidates invalid due to oppressive conditions Jalgaon News)
चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या २०२३-२०२८ या पंचवार्षिक कालावधी संचालक मंडळाच्या निवडणुकीत २१ जागांसाठी १७१ अर्ज दाखल झाले होते. यापैकी २१ अर्ज बाद करण्यात आले. उमेदवारी अर्जांची छाननी महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) नियम २०१४ मधील नियम २५ च्या तरतुदीन्वये घेतली असता, उत्पादक सभासदांचा मतदारसंघातील उमेदवारी नाकारण्यात येत असल्याचे सूचित केले असल्याचे पत्र उमेदवारांना दिले आहे.
गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून
वास्तविक ही अट जनरल मिटिंग घेऊन शिथिल करून घ्यायला पाहिजे होती. किंवा ही अट साखर उपसंचालक औरंगाबाद यांच्याकडून शिथिल करून घ्यायला पाहिजे होती, पण तसे झाले नसल्याने अडचणी येत आहे. प्रामाणिक शेतकरी सभासदांना या अटीचा फटका बसला आहे. २०२१-२२ चे गाळप डिसेंबरमध्ये सुरू झाले. मार्चनंतर उसतोड कामगार उन्हामुळे जास्त वेळ टिकत नाही. या सर्व कारणांमुळे चोसाकाला ऊसपुरवठा करण्यात अडचणी आल्या. यासाठी शेतकरी जबाबदार आहे का? मग ही अट कशासाठी, यासाठी न्यायालयापुढे हे स्पष्ट करणे आवश्यक आहे.
असे झाले होते गाळप
वर्षनिहाय गाळप
२०१४-२०१५ : २ लाख १८ हजार
२०१५-२०१६ : ६९ हजार
२०१६-२०१७ : १९ हजार (उशिरा सुरू गाळप)
२०१७-२०१८ : ३४ हजार
२०१८-२०१९ : बंद
२०१९-२०२० : बंद
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.