Jalgaon Bingo Circus : सर्कस मोजतेय अखेरच्या घटका...! डोलारा हाकताना मालकाची ‘कसरत’

Throwing the ring up and catching it again in the circus and Female performers performing on the wire at Bingo Circus.
Throwing the ring up and catching it again in the circus and Female performers performing on the wire at Bingo Circus. esakal
Updated on

Jalgaon News : हत्ती-घोड्यांचा लवाजमा... सिंह-वाघांचे आकर्षण... कलावंतांच्या श्‍वास रोखून धरणाऱ्या कसरती अन्‌ जोकरच्या खळखळून हसविणाऱ्या करामती.. सर्कशीतलं हे निव्वळ मनोरंजन करणारं चित्र पार बदलून गेलंय. (circus is on verge of extinction jalgaon news)

या साऱ्या आकर्षण ठरणाऱ्या गोष्टींअभावी सर्कस अखेरच्या घटका मोजतेय. या प्रतिकूल स्थितीतही काही संचालकांनी कलावंतांच्या कसरतींवर मदार ठेवून सर्कशीचा तंबू ‘हलता’ ठेवलाय, ही मोठी गोष्ट...

आता तिशी-चाळिशीत असलेल्या पिढीपर्यंत सर्कसचा अनुभव जवळपास प्रत्येकानेच घेतलाय. यानंतरच्या पिढीला अभावानेच सर्कस पाहायला मिळाली... तर २०००-२०१०च्या दशकात जन्माला आलेल्या व आताच्या पिढीला वन्यप्राण्यांच्या कसरतींची धमाल असलेल्या सर्कशीचा गंधही नाही. ‘ती’ सर्कस या पिढीसाठी पालकांच्या मुखातील व पुस्तकांमधील गोष्टच उरलीय.

प्राण्यांचे आकर्षण गेले

सर्कस म्हटली म्हणजे एकेकाळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आकर्षण असायचे. त्या वेळी पुस्तकात चित्र पाहिलेले वाघ, सिंह, हत्ती, उंट, अस्वल हे प्रत्यक्षात पाहावयास मिळायचे. त्यातील पुरुष व महिलांच्या कसरती आणि ‘जोकर’च्या गमतीजमती प्रेक्षकांना खिळवून ठेवायच्या...

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Throwing the ring up and catching it again in the circus and Female performers performing on the wire at Bingo Circus.
Jalgaon News : पुनःपुन्हा आपत्तीने शेतकरी दुष्टचक्रात; 10 महिन्यांतील चित्र

गेल्या काही वर्षांत सरकारने सर्कसमध्ये प्राण्यांवर बंदी आणली आणि सर्कसचे महत्त्व कमी झाले. केवळ कमीच झाले नाही, तर अगदी सर्कसचा तंबूच आता दिसेनासा झालांय. तरीही कलाकारांनी हार मानली नाही. अगदी त्यांनी आपल्या कसरतींवर प्रेक्षकांना खिळवून ठेवत सर्कस सुरूच ठेवली आहे. कलाकार कसरतीच्‍या कला तेवढ्याच ताकदीने सादर करून उपस्थित प्रेक्षकांकडून टाळ्या मिळवीत आहेत.

नामशेष होण्याच्या मार्गावर

सर्कसमध्ये जोकरच्या गमतीजमती, जादूचे प्रयोग, धाडसी खेळ अशा विविध माध्यमांतून मनोरंजन केले जात होते. मात्र, डिजिटल युगामुळे सर्कस केवळ पुस्तकातच शिल्लक राहण्याची शक्यता आहे. आता या सर्कसला घरघर लागली आहे.

प्रेक्षक कमी, उत्साह तोच

जळगाव शहरात आलेल्या ‘बिंगो सर्कस’ला प्रेक्षकांची संख्या कमी झाली असली तरी या कलाकारांचा उत्साह मात्र कमी नाही. सर्कसमधील प्राण्यांना पर्याय नसला तरी टेडीबेअर, चिम्‍पांजीचे ड्रेस परिधान करून मुलांचे मनोरंजन करण्यावर भर दिला जात आहे.

Throwing the ring up and catching it again in the circus and Female performers performing on the wire at Bingo Circus.
Jalgaon News : ‘एमआयएम’ नगरसेवकांना नोटीस; पक्षविरोधी केले काम

सर्कसवर कलाकारांचं जगणं

जळगावात दाखल ‘बिंगो सर्कस’मध्ये देशभरातील जवळपास ५४ कलाकार काम करत आहेत. या कलाकारांसह ३०-४० जणांचे जगणे सर्कसवर अवलंबून आहे. हीच सर्कस नामशेष होण्याच्या मार्गावर असल्यामुळे हे सर्व कलाकार उदरनिर्वाह कसा करणार, हा मोठा प्रश्न भविष्‍यात असेल.

‘सर्कस’ चित्रपट, मालिकांचा विषय

सत्तर ते नव्वदीच्या दशकात सर्कस इतक्या लोकप्रिय होत्या, की सर्कस विषय घेऊन ‘मेरा नामक जोकर’सारखे चित्रपट हीट झाले. दूरचित्रवाहिनीवर अगदी ‘सर्कस’ हा विषय घेऊन मालिका प्रसारित झाली होती. ‘फौजी’ या मालिकेनंतर शाहरुख खानने ‘सर्कस’ मालिकेत काम केले. या मालिकेतून तो चित्रपटसृष्टीत आला अन्‌ स्टार झाला.

"१९८४ पासून सर्कस चालवीत आहे. पूर्वीच्या काळात सर्कसमध्‍ये प्राणी असल्‍याने प्रेक्षकांची गर्दी खूप असायची. ही गर्दी आता लोप पावत असून, पुढच्‍या पाच वर्षांत सर्कस काय हे पाहावयास मिळणार नाही." -राजन पिल्‍लाई, व्‍यवस्‍थापक, बिंगो सर्कस

Throwing the ring up and catching it again in the circus and Female performers performing on the wire at Bingo Circus.
Jalgaon Agriculture News : बोगस बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोचणार नाही याची दक्षता घ्या : मोहन वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.