Jalgaon News : वाडे येथील जवानाचा दिल्लीत हृदयविकाराने मृत्यू

Army Man Manish choudhari
Army Man Manish choudhariesakal
Updated on

कजगाव (जि. जळगाव) : वाडे (ता. भडगाव) येथील रहिवासी व फरिदाबाद (दिल्ली) येथे सेंट्रल इंडस्ट्रिअल सेक्युरिटी फोर्समध्ये (सीआयएसएफ) देशसेवा बजावत असलेले जवान मनीष लक्ष्मण चौधरी (वय ३५) यांचा रविवारी (ता. २२) रात्री आठच्या सुमारास दिल्ली येथे हृदयविकाराने मृत्यू झाला. (CISF soldier died in delhi due to heart attack jalgaon news)

या घटनेने वाडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या जवानाचे पार्थिव दिल्लीहून विमानाने औरंगाबाद येथे आणणार असून, तेथून विशेष वाहनाने वाडे येथे आणले जाईल. उद्या (ता. २४) त्यांच्या पार्थिवावर वाघळी रस्त्यालगतच्या शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनासह नातेवाइकांकडून देण्यात आली.

जवान मनीष चौधरी हे वाडे येथील रहिवासी असून, जिल्हा परिषदेतील निवृत्त लिपिक लक्ष्मण ओंकार चौधरी यांचे लहान चिरंजीव होत. मनीष चौधरी हे नऊ वर्षांपूर्वी सीआयएसएफमध्ये दिल्ली येथे भरती झाले होते. दिल्ली (फरिदाबाद) येथे सध्या ते सेवा बजावत होते.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

Army Man Manish choudhari
Jalgaon news : नीम येथील ग्रामसेवक लाचेच्या जाळ्यात; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

दरम्यान, रविवारी (ता. २२) रात्री आठच्या सुमारास जेवण करून थोडा आराम करून फरिदाबाद येथे ड्यूटीवर जाणार होते. तोच क्रूर काळाने त्यांच्यावर घाला घातला. अचानक हृदयविकाराने मनीष चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना दिल्ली येथील दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

या दुर्दैवी मृत्यूने वाडे परिसरात शोककळा पसरलेली आहे. त्यांचे पार्थिव दिल्ली येथून विमानाने औरंगाबाद येथे व तेथून विशेष वाहनाने वाडे गावी आणणार आहेत. मंगळवारी (ता. २४) सकाळी नऊला वाडे गावालगत वाघळी रस्त्याला लागून शेतात त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात वडील, आई, भाऊ, पत्नी, ३ वर्षाची मुलगी असा परिवार आहे.

Army Man Manish choudhari
Jalgaon News : शेतकरी नवरा नको गं बाई! ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.