Zero Shadow Day : जब... परछाई भी अपना साथ छोड दे..! जळगावकरांनी अनुभवला शून्य सावली दिवसाचा क्षण

Astro-loving citizens experiencing zero shadow moments
Astro-loving citizens experiencing zero shadow moments esakal
Updated on

Jalgaon News : एक दिवस असा येतो, की त्या दिवशी सावलीही आपल्यासोबत नसते... हिंदीत ‘जब... परछाई भी अपना साथ छोड दे..’ असे म्हटले जाते. (citizen experience zero shadow day jalgaon news)

आपल्यासोबत कुणीच राहत नाही, म्हणून हे बोलले जात असले तरी भौगोलिक चक्रानुसार वर्षभरातून एक दिवस, एक क्षण खरोखरच असा येतो, की सावली बरोबर आपल्या पायाखाली जाते, तो क्षण गुरुवारी (ता. २५) जळगावकरांनी प्रत्यक्ष अनुभवला.

गुरुवारी घड्याळानुसार दुपारी १२ वाजून २४ मिनिटे ४५ सेकंदांनी व सौरघड्याळानुसार दुपारी बाराला सूर्य जळगावच्या डोक्यावर आल्याने सूर्यकिरणे प्रत्येक उभ्या वस्तूवर लंबरूप पडली व सावली इकडे तिकडे न पडता पायापाशी पडली. अर्थात, सावलीच गायब झाल्याचा म्हणजेच ‘शून्य सावली क्षणा’चा अनुभव जळगावकरांनी या वेळी घेतला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Astro-loving citizens experiencing zero shadow moments
शून्य सावली म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या तुमच्या शहरात कधी असेल 'Zero Shadow Day'

अभ्यासकांकडून प्रात्यक्षिक

अमोघ जोशी यांनी तयार केलेले Horizontal Sundial, Equatorial Sundial ही सौरघड्याळे (सनडायल) ठेवण्यात आली होती. हातातील घड्याळ आणि सौरघड्याळ यांच्या वेळेतील फारकामुळे हातातील घड्याळ्यानुसार १२ वाजून २४ मिनिटांनी आणि सौरघड्याळ्यानुसार बाराला शून्य सावली क्षण येण्याचे कारण, त्यामागील विज्ञान प्रात्यक्षिकाद्वारे खगोलप्रेमींनी जाणून घेतले.

किरण वंजारी, विवेक उपासनी, श्रेया चौरसिया, नेहा चौरसिया, हेरंभ वाणी, सिद्धेश बडगुजर, प्रथमेश पाटील, समृद्धी वाणी, हिमांशू चौधरी आदी उपस्थित होते.

Astro-loving citizens experiencing zero shadow moments
Jalgaon Banana Rate : केळीचे भाव घसरले; शेतकऱ्यांना फटका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.