Jalgaon Crime News : पाळधीत 2 गटांत हाणामारी

crime
crimeesakal
Updated on

Jalgaon Crime News : धरणगाव तालुक्यातील पाळधी बुद्रुक येथे शिवीगाळ केल्याच्या कारणावरून दोन गटांत शुक्रवारी (ता. १०) रात्री हाणामारी झाली.

दोन्ही गटांकडून दगड, विटा, लाठ्याकाठ्या, फायटर, रॉड व चाकूचा वापर झाला. (Clash between 2 groups in Paldhi jalgaon crime news)

हाणामारीत तीन किरकोळ जखमी झाले. दोन्ही गटांच्या परस्पर तक्रारीवरून २२ जणांविरोधात धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला. शुक्रवारी रात्री नऊला काही जणांनी शिवीगाळ का करतो, असा जाब विचाल्याच्या रागातून बळिराम साळुंखे व त्यांचा पुतण्या नीलेश यास लाठ्याकाठ्या व लोखंडी आसारीने मारहाण केली. याप्रकरणी बळिराम साळुंखे यांनी धरणगाव पोलिसांत फिर्याद दिली.

त्यानुसार संशयित प्रकाश झीपरू सपकाळे, रमेश पुंडलिक सपकाळे, राजाराम झिपरू सपकाळे, लखन प्रकाश सपकाळे, कल्पेश प्रकाश सपकाळे, महेंद्र रोहिदास सपकाळे, नरेंद्र पुंडलिक सपकाळे (सर्व रा. पाळधी बुद्रुक ता. धरणगाव) यांच्याविरोधात धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

crime
Jalgaon Crime News : शेतकऱ्याचे 2 लाख मुक्ताईनगरातून लंपास

तसेच दुसऱ्या तक्रारीत आपल्याला काहीही कारण नसताना गावातील १४ ते १५ जणांनी लाठ्याकाठ्या, फायटर, दगड, विटा, चाकू, लोखंडी रॉडने मारहाण केल्याची तक्रार नरेंद्र सपकाळे यांनी धरणगाव पोलिसांत केली.

त्यांच्या तक्रारीवरून सोपान देवीदास साळुंखे, बळिराम भगवान साळुंखे, श्रीकृष्ण गंगराम साळुंखे, मच्छिंद्र बळिराम साळुंखे, डिगंबर भास्कर साळुंखे, नीलेश कृष्णा साळुंखे, कैलास सोपान साळुंखे, संदीप सुदाम साळुंखे, विष्णू भगवान साळुंखे, भास्कर गंगाराम साळुंखे, कैलास भगवान साळुंखे, वासुदेव बळिराम साळुंखे, ज्ञानेश्वर सोपान साळुंखे, रोहित विष्णू साळुंखे, प्रीतम मच्छिंद्र साळुंखे (सर्व रा. कोळीवाडा, पाळधी, ता. धरणगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. पोलिस नाईक विठ्ठल पाटील तपास करीत आहे.

crime
Jalgaon Crime News : शेतरस्त्याच्या वादातून पिंपळगावात हाणामारी; गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.