Jalgaon News : .वॉटरग्रेसच्या कर्मचाऱ्यांचा सफाईबंदचा इशारा

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporationesakal
Updated on

जळगाव : शहरातील दैनंदिन कचरा संकलनाचा मक्ता वॉटरग्रेस कंपनीला दिला आहे. या कंपनीने कर्मचाऱ्यांचे पगार थकविले आहेत.

त्यामुळे गुरुवारी (ता. १३) घंटागाडीचालकांनी आक्रमक भूमिका घेत महापालिकेत आयुक्त देविदास पवार यांची भेट घेतली व शुक्रवारी (ता. १३) पगार न झाल्यास शहरातील कचरा संकलन करणार नसल्याचा इशारा दिला.

दरम्यान, मक्ता घेणारी ‘वॉटरग्रेस’ कंपनी मात्र नामानिराळी असून, महापालिका व जनतेला वेठीस धरण्यात येत आहे. (Clean up alarm by Water Grace staff alert Municipal corporation about workers salary Jalgaon News)

Jalgaon Municipal Corporation
Breaking News : सिन्नर शिर्डी महामार्गावर भीषण अपघात; १० जणांचा मृत्यू

वॉटरग्रेस कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे पगार दर महिन्याच्या दहा तारखेला होतात. या वेळी मक्तेदारांनी कर्मचाऱ्यांचे पगार केले नाहीत. त्याने थेट कर्मचाऱ्यांना महापालिकेकडे बोट दाखविले. महापालिकेने आपल्यााला रक्कम दिली नाही.

त्यामुळे आम्ही तुमचे वेतन केले नाही, असे स्पष्ट सांगितले. त्यामुळे मक्तेदाराकडे पगाराची मागणी न करता कर्मचारी थेट महापालिकेत आले आणि त्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी आग्रह केला. यावर आयुक्त देवीदास पवार यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधित्व करणाऱ्यांना बोलावून घेतले.

गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

Jalgaon Municipal Corporation
Nashik News : मीनाताई ठाकरे उद्यानात स्वच्छता मोहीम; उद्यानातील खेळण्यांची लवकरच दुरुस्ती!

यात काही कर्मचाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेत पगार न झाल्यास कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला. मक्तेदाराच्या कर्मचाऱ्यांचे वेतन देणे ही मक्तेदाराची जबाबदारी आहे, असे आयुक्तांनी ठणकावल्याचे सांगण्यात येत आहे.

महापालिकेकडे बिले लवकरच दिले जाणार असल्याचे आश्‍वासन दिले आहे. कर्मचाऱ्यांनी मात्र आमच पोट रोजदांरीवर आहे. त्यामुळे आम्हाला वाद नको आहे. वेतन वेळेवर मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

वॉटरग्रेस कंपनीची पगार देण्याची जबाबदारी असतानाही ते थकवून कर्मचाऱ्यांना महापालिका जबाबदार असल्याचे सांगून नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी वॉटरग्रेस कंपनीवर महापालिका कोणती कारवाई करणार, याकडे आता लक्ष लागून आहे.

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon News : पतंगाच्या दोरी लुटताना जीवनाची दोरी तुटली तर?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()