मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : परतीच्या प्रवासाला निघालेल्या मॉन्सूनने चाळीसगाव तालुक्यात मोठा फटका बसला. काही भागांत अल्प, तर काही भागात अतिवृष्टी झाली. एकाच दिवसात तालुक्यात तब्बल ३९८ मिलिमीटर पाऊस झाला.
मेहुणबारे, खडकी आणि तळेगाव मंडळात तर अतिवृष्टी झाली. या परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या खरीप पिकाचे नुकसान होण्याची भीती आहे.(Climate News Return Rains wreak havoc in district Jalgaon News)
चाळीसगाव तालुक्यात शुक्रवारी पावसाला सुरुवात झाली. दिवसभर मध्यम व जोरदार पाऊस झाला. परतीच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले. सात मंडळांपैकी तीन मंडळांत अतिवृष्टी झाली. त्यात तळेगाव मंडळात पावसाने कहर केला.
या मंडळात एकाच दिवसात तब्बल ११० मिमि पाऊस झाला. मेहुणबारे मंडळात ७७ मिमि आणि खडकी मंडळात ६८ मिमि अशी अतिवृष्टी झाली. तर चाळीसगाव मंडळात २२ मिमि, बहाळ मंडळात २४ मिमि, हातले मंडळात ३९ मिमि, शिरसगाव मंडळात ५८ मिमि असा एकूण तालुक्यात ३९८ मिमि इतका पाऊस झाला आहे. तालुक्यात आतापर्यंत ८४४.१८ मिमि पाऊस झाला.
पिकांना फटका
परतीच्या पावसाने गुरुवारी रात्री कहर केला. त्यामुळे अनेक भागांतील नदी-नाल्यांना पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. परतीच्या तडाख्यामुळे काही भागात काढून ठेवलेली मक्याची कणसे पाण्यात भिजली. काही दिवसांपासून थांबल्याने व कडक ऊन पडल्याने कपाशी वेचणीची लगबग सुरू होती. मात्र कालच्या परतीच्या पावसाने कपाशीलाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.