धरणगाव : एरंडोल, धरणगाव, चोपडा या रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणत ऊस वाहतूक सुरू आहे. मात्र ही वाहतूक ट्रकऐवजी ट्रॅक्टरने मोठ्या प्रमाणात होत असून, एका ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडलेल्या असतात.
यामुळे रस्त्यावर चालणाऱ्या पादचाऱ्यांच्या जीवाला धोका संभवतो, त्यासाठी डबल ट्रॉलीने वाहतूक बंद करावी, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा डॉ. हेगडेवारनगर ग्रामस्थांनी दिलेला आहे.
एरंडोल परिसरातून चोपडा साखर कारखान्यावर जाणारा ऊस हा धरणगाव मार्गे जात असतो, ही ऊस वाहतूक डबल ट्रॉलीच्या ट्रॅक्टरने होत आहे. (Close sugarcane transport with double trolley demand of residents Warning of agitation Jalgaon News)
अनेक वेळा ट्रॉलीमधून उसाचे पेंढे खाली पडत जातात, ते रस्त्याने चालणाऱ्या वाटसरुंच्या अंगावर देखील पडण्याची भीती असते. शिवाय रस्त्यावर पडलेल्या उसावरून वाहन गेल्याने तो रस्त्याचा भाग चिकट होऊन तेथे दुचाकी वाहने, सायकलस्वार निसटून पडण्याची भीती आहे. अनेक वेळा अशा किरकोळ घटना देखील झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे डबल ट्रॉली असलेले ट्रॅक्टरची मागची ट्रॉली पलटी होण्याची भीती असते. शेतकऱ्यांचा ऊस हा कारखान्यापर्यंत पोचला पाहिजे.
मात्र ही वाहतूक करीत असताना निरापराध नागरिकांना त्रास नको, याची काळजी घेतली गेली पाहिजे. यासाठी साखर कारखाना प्रशासनाने दखल घेऊन अशा प्रकारच्या वाहतुकीला मनाई केली पाहिजे, अशी मागणी होत आहे.
उसाची वाहतूक ही ट्रक अथवा सिंगल ट्रॉली ट्रॅक्टरने करावी. पोलिसांनी देखील अशा डबल ट्रॉलीचे ट्रॅक्टर वाहतुकीला परवानगी आहे काय? यांची विचारणा केली पाहिजे, अशी परवानगी नसेल तर या वाहनावर कारवाई करावी.
या वाहतुकीमुळे कुणाचा जीव जाण्याची वाट न पाहता कारवाई करावी ऊस वाहतूक करताना रस्त्याने उसाचे पेंढ्या पडणार नाहीत, याची काळजी वाहतूक कॉन्ट्रॅक्टर यांनी घ्यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डॉ. हेगडेवारनगर ग्रामस्थांनी दिला आहे.
याबाबत पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्याशी संपर्क केला असता, ते देखील साखर कारखाना प्रशासनासोबत पत्र व्यवहार करणार असून प्रत्यक्ष बोलून यावर काही तोडगा काढता येईल का? अशी चर्चा करणार आहेत. या वाहतुकीत सर्वसामान्य नागरिकांना काही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत सूचना देणार असल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.