कजगाव (जि. जळगाव) : नगरदेवळा स्टेशन (ता. भडगाव) येथील बंद असलेल्या सुतगिरणीच्या (Cotton Mill) खोल्यांमध्ये राजरोसपणे जुगार (Gambling) सुरु असल्याने ही बंद सुतगिरणी जुगाराचा अड्डा (Gambling Den) बनली आहे. याबाबत स्थानिक पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी आजूबाजूच्या रहिवाशांमधून होत आहे. (Closed cotton mill in Nagar Deola became gambling den Jalgaon crime news)
नगरदेवळा रेल्वे स्थानकाजवळील सहकारी सुतगिरणी ही बऱ्याच वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. त्याचा फायदा काही जुगारींनी घेत, येथील बंद खोल्यांचे दरवाजे उघडून अक्षरशः जुगाराचा अड्डा सुरु केला आहे. या ठिकाणी आजूबाजूच्या खेड्यांसह जवळच्या तालुक्यांमधील जुगारी खास खेळण्यासाठी येत असतात. दररोज लाखोंची उलाढाल या जुगार अड्ड्यांवर होत असते. सध्या ही सुतगिरणी जिल्हा सहाय्यक निबंधकांच्या ताब्यात असून या ठिकाणी एक सुरक्षा रक्षकही नेमलेला आहे. असे असतानाही येथे सर्रासपणे जुगाराचा अड्डा सुरु असतो. या जुगार अड्ड्यांमुळे आजूबाजूच्या वस्तीतील अनेक तरुण मुले त्याच्या आहारी गेली आहेत.
प्राप्त माहितीनुसार, येथील जुगार अड्डा चालवणाऱ्यांनी वॉचमनशी आर्थिक हितसंबंध जोपासले आहेत. त्यामुळे याबाबत तक्रार करुनही कुठलीच कारवाई केली जात नसल्याचा अनुभव रहिवाशांना आलेला आहे. याबाबत जिल्हा उपनिबंधकांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन सुतगिरणीत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या संदर्भात पोलिस निरीक्षक अशोक उत्तेकर यांना विचारणा केली असता, आमच्या संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांकडून माहिती घेऊन जुगार अड्डा सुरु असेल तर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.