जळगाव : आकाशवाणी चौकातील हॉटेलमधील (Hotel) कॅश काउंटरचे कुलूप तोडून मुद्देमाल लांबविण्याच्या तयारीत असलेल्या दोन चोरट्यांना हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास रंगेहाथ पकडले. (Closed hotel cash counter Attack thieves while breaking thieves were caught by hotel staff jalgaon crime news)
त्यांच्याकडून मॅनेजरचा चोरलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला. चोरट्यांविरुद्ध जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील आकाशवाणी चौकातील हॉटेल मुरलीमनोहर येथे मॅनेजर म्हणून हिरालाल तेजपाल उपाध्याय कार्यरत आहे. रात्री अकराला हॉटेल बंद करून ते रूपकिशोर चौधरी, धीरज रावत या कारागिरांसोबत हॉटेलमध्येच झोपले होते.
या वेळी त्यांनी आपला मोबाईल त्यांच्या उशाशी ठेवला होता. मध्यरात्रीच्या सुमारास कारागीर धीरज रावत हा पाणी पिण्यासाठी उठला असता, त्याला हॉटेलच्या काऊंटरवर दोन अनोळखी इसम काउंटरचे लॉक उघडत असल्याचे दिसले.
त्यांनी लागलीच झोपलेल्या मॅनेजरसह आपल्या सहकाऱ्यांना याची माहिती दिली. त्या दोन चोरट्यांना चाहूल लागताच ते दोघे पळून जात असताना हॉटेलच्या मॅनेजरसह दोघांनी त्यांना पकडले. घटनेची माहिती हॉटेलचे मालक लेखराज उपाध्याय यांना दिली. त्यांनी लागलीच हॉटेलमध्ये धाव घेत घटनेची माहिती पोलिसांना दिली.
हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
चोर पोलिसांच्या स्वाधीन
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेल्या पोलिस पथक घटनास्थळी धडकले. त्यांनी त्या दोघे चोरट्यांची अंगझडती घेतली असता एकाच्या खिशात मॅनेजरचा चोरलेला मोबाईल तर दुसऱ्याच्या खिशात वायर कटर आढळून आले.
पोलिसांनी दोघे चोरट्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव आकाश श्रीकृष्ण जंजाळे (वय-२३, रा. समता नगर बौद्ध वाडा), प्रदीप धनराज पवार (वय-१९, रा. संतोष अप्पा नगर, वाघनगर) असे सांगितले.
त्यांनी आपली दुचाकी हॉटेलच्या मागील बाजूला असलेल्या गेटजवळ लावून हॉटेलची संरक्षक भिंतीवरून उडी मारुन हॉटेलमध्ये प्रवेश केला. पोलिसांनी चोरट्यांना पोलिस ठाण्यात आणून त्या दोघांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.