जळगाव : शहर पोलिस ठाण्यासमोरील फुले मार्केटमधील कापड दुकान फोडून ४५ हजार रुपये किमतीचा माल चोरट्यांनी चोरून (Burglary) नेल्याची घटना घडली. शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (cloth shop robbed in Phule Market Thieves stole clothes worth 45000 Latest Jalgaon Crime News)
शहरातील पांझरापोळ, नेरीनाका परिसरात भूषण राजेंद्र पाटील (वय २८) आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. त्यांचे फुले मार्केटमध्ये देवा मेन्स वेअर नावाचे कापड दुकान आहे. नेहमीप्रमाणे काल रात्री ते दुकान बंद करून घरी गेले होते.
मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश करत सुमारे ४५ हजार रुपये किमतीचे कापड चोरून नेला. नेहमीप्रमाणे दुपारी दुकान उघडले असता त्यांना दुकानात चोरी झाल्याचे उघडकीला आले. भूषण पाटील यांनी तातडीने शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय निकुंभ करीत आहे. शहर पोलिस ठाण्याच्या अगदी समोरच फुले मार्केटच असून रात्रीची पोलिस गस्ती, वॉचमन, गुरखा अशी सुरक्षा असताना चोरट्यांनी मध्यरात्री दुकानाचे शटर वाकवून चोरी केल्याने पोलिस ठाण्यासमोरील मार्केटही असुरक्षित असल्याची चर्चा फुले मार्केटच्या व्यापाऱ्यांमध्ये होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.