CM Shinde in Jalgaon : शिंदे-फडणवीसांना खडसेंची धास्ती? काळे झेंडे दाखवण्याआधीच रोहिणी खडसे पोलिसांच्या ताब्यात

CM Eknath Shinde Devendra Fadnavis visit to Jalgaon NCP workers  Rohini Khadse detained by police
CM Eknath Shinde Devendra Fadnavis visit to Jalgaon NCP workers Rohini Khadse detained by police
Updated on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव दौऱ्यावर जाणार आहेत. दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत असलेल्या एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यासोबतच देखील पोलिसांनी राष्ट्रवादीच्या इतरही पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

शिंदे-फडणवीसांना जळगाव येथे काळे झेंडे दाखवणार असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला होता. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान जळगाव येथे राज्य सरकारचा 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी शिंदे-फडणवीस हे जळगाव येथे जाणार आहेत. कापूस प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

CM Eknath Shinde Devendra Fadnavis visit to Jalgaon NCP workers  Rohini Khadse detained by police
CM Shinde in Jalgaon: मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी जळगावकरांचे रेशनपाणी होणार बंद ? ही तर अफवाच ! जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

एकनाथ खडसे काय म्हणाले?

रोहिणी खडसे आणि काही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर एकनाथ खडसेंनी सरकारवर टीका केली आहे. शासनाकडून पोलिसांच्या माध्यमातून दडपशाही केली जात आहे, काळे झेंडे दाखवले नाहीत किंवा ते रस्त्यावर देखील उभे नव्हते. ते सर्वजण राष्ट्रवादीच्या कार्यालयात होते. त्या ठिकाणी पोलिसांनी धूडगुस घातल कारवाई केली, महिलांना उचलून नेलं. ही का हुकूमशाही आहे की लोकशाही? आता हजारो महिली स्वतः निषेध करणारचं आहेत तेव्हा तुम्ही काय करणार आहात असा सवाल एकनाथ खडसे यांनी यावेळी केला.

CM Eknath Shinde Devendra Fadnavis visit to Jalgaon NCP workers  Rohini Khadse detained by police
Bhiwandi News : काँग्रेसने दिला राष्ट्रवादीला मोठा झटका! भिंवडीत १८ नगरसेवक सहा वर्षांसाठी अपात्र

तसेच पोलिस व्हॅनमधून घेऊन जात असताना रोहिनी खडसे यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. एवढी दादागिरी कशी सहन करावी, आम्ही पश्र कार्यालयात शांततेत बसलेले होतो, आम्ही कुठली घोषणा देखील दिली नाही, असे रोहिणी खडसे म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.