जळगाव : आमदार जाण्याच्या भीतीने आपण घाबरलो आहोत.. त्यामुळे राज्यात उद्घाटनांच्या कार्यक्रमांना फिरतोय, अशी टीका विरोधक करताहेत.. मात्र आपण मुळीच घाबरलेलो नाही, तर
सर्वसामान्यांची कामे करून विरोधकांच्या टीकेला आपण कामांमधून उत्तर देत आहोत, असा सणसणीत टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी विरोधकांना लगावला. (cm eknath shinde statement about opponents jalgaon news gbp00)
जळगाव जिल्ह्यातील भोकर येथे तापी नदीवर उभारण्यात येणाऱ्या पुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी (ता. १६) झाले. त्या वेळी ते बोलत होते. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे,
उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार लता सोनवणे, आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, अनिल पाटील, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, खासदार रक्षा खडसे, उन्मेश पाटील आदी उपस्थित होते.
‘मुख्यमंत्री साध्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासही हजर राहत असल्याची टीका विरोधक करतात’, असा मुद्दा गिरीश महाजन यांनी उपस्थित केल्यानंतर महाजन यांच्या बोलण्याचा हाच धागा पकडून मुख्यमंत्री म्हणाले, की काय म्हणतात विरोधक,
मी घाबरलो, म्हणून फिरतोय! विरोधकांच्या अशा टीकेला आपण शब्दाने नव्हे, तर जनतेच्या कामातून उत्तर देत आहोत. आपले सरकार स्थापन होऊन सात महिने झाले, शपथ घेतल्यानंतर आपण सतत जनतेसाठी काम करतोय. सर्वसामान्य जनता, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहोत.
हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
जनतेच्या कामांचा अजेंडा
केवळ आम्ही जनतेचा अजेंडा घेऊन काम करीत आहोत, आमचा कोणताही वैयक्तिक अजेंडा नाही. आपण आज सकाळी सिंधूदुर्ग येथे होतो, दुपारी जळगावात आहोत, सायंकाळी पारोळा येथे, तर रात्री मुंबई येथे अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहोत. आपल्या सततच्या कामामुळे जनतेचाही उदंड प्रतिसाद आपल्याला मिळत आहे, हे कामच विरोधकांच्या टीकेला उत्तर आहे.
संपूर्ण राज्याची गरज ओळखून आपण विकासाची कामे करीत आहोत, समृद्धी महामार्ग हा एक आज चमत्कार ठरत आहे. आज नागपूर-मुंबई हे अंतर कमी झाले आहे. त्यामुळे उद्योग, व्यवसायाच्या विकासाची दारे उघडी झाली आहेत. आपले सरकार सकारात्मक आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी योजना राबवीत आहोत.
शेतकरी जगला पाहिजे हेच सरकारचे धोरण आहे. त्यामुळे ‘एनडीआरएफ’च्या निकषाच्या बाहेर जाऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली आहे. राज्यात ३८ हजार पिण्याच्या योजना राबविल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी जे-जे करता येईल, ते आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.