‘Vedanta Foxconn’च्या चौकशीतून सत्य समोर आणू : CM एकनाथ शिंदे

Chief Minister Eknath Shinde. Speaking at a meeting held Muktainagar on Tuesday,
Chief Minister Eknath Shinde. Speaking at a meeting held Muktainagar on Tuesday, esakal
Updated on

जळगाव : ‘वेदांता फॉक्सकॉन’ला महाविकास आघाडी सरकारने कोणतेही सहकार्य केले नाही, त्यामुळेच ती कंपनी बाहेर गेली आणि ते आमच्यावर खापर फोडत आहेत. परंतु याची चौकशी करून ‘दूध का दूध पानी का पानी करू, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. मुक्ताईनगर येथे ते बोलत होते. (CM Eknath Shinde Statement on investigation of Vedanta Foxconn project at muktainagar Latest Jalgaon News)

मुक्ताईनगर येथे मंगळवारी (ता. २०) क्रीडा संकुल मैदानावर जाहीर सभा झाली. या वेळी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आमदार बच्चू कडू, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार लता सोनवणे आदी उपस्थित होते.

या वेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, की आम्हाला २०-२० खेळायची आहे. कमी वेळेत जास्त धावा काढायच्या आहेत. मी आणि फडणवीस आम्ही आव्हान स्वीकारले आहे. ते आम्ही करून दाखविणार आहोत. आमच्यावर टीका होत आहे. मात्र आपण त्याचा विचार करीत नाही. आपल्याला जनतेचे भले करून दाखवायचे आहे, ते आपण करणार आहोत. आम्हाला कंत्राटी मुख्यमंत्री म्हटले जाते, होय आम्ही कंत्राट घेतले आहे, विकासचे आणि जनतेला न्याय देण्याचे, असेही ते म्हणाले.

‘दाऊद’पेक्षा मोदीचा हस्तक योग्य

नवाब मलिक यांचे नाव न घेता ते म्हणाले, की आघाडी सरकारमध्ये मुंबई बॉम्बस्फोट घडविणाऱ्या दाऊदचा हस्तक एक मंत्री असल्याचे दिसून आले. त्याच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता आणि आम्हाला मोदींचा हस्तक म्हणतात, दाऊदपेक्षा मोदींचा हस्तक झालेले चांगले

सत्तेसाठी तडजोड नाही

आपण सत्तेसाठी कोणतीही तडजोड केली नाही, असे सांगून ते म्हणाले, ज्यांनी २५ वर्षे युती टिकवली, त्यांच्याशी युती करायची नाही तर कुणाशी करायची, त्यामुळे आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे नेत आहोत.

Chief Minister Eknath Shinde. Speaking at a meeting held Muktainagar on Tuesday,
2 वर्षांनंतर वणीच्या जगदंबा मंदिरात हजारावर महिला भाविक घटी बसणार

खडसेंची एकाधिकारशाही संपविली

एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना, ते म्हणाले खडसे यांनी या ठिकाणी एकाधिकारशाही निर्माण केली होती. मात्र ती आता चंद्रकांत पाटील यांनी संपवून टाकली आहे. तो एकनाथ जरी चंद्रकांत यांना त्रास देत असला तरी हा एकनाथ त्यांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या वेळी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी खडसे यांच्यावर टीका केली, ते म्हणाले मी मी म्हणणाऱ्याचा वध झाला, रावणाचा, नरकासुराचा वध झाला. त्या मुळे त्यांचे दिवस संपले आहेत. आता आपले दिवस आले आहेत.

खडसेंच्या त्रासाला कंटाळलो; चंद्रकांत पाटील

आमदार चंद्रकांत पाटील प्रास्ताविकात म्हणाले की, आपल्याला खडसे यांचा इतका त्रास झाला की, आपले सरकार असतानाही मला त्रास त्रास झाला,आपण राजकारण सोडण्याच्या तयारीत होतो. त्यांनी ३५ वर्षे काहीही केले नाही परंतु आपण काम करतो तर आपल्याला त्रास दिला जातो. मुक्ताईनगरात औद्योगिक वसाहत करण्याची त्यांनी मागणी केली. या वेळी मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते अत्यंत विराट सभा होती.

Chief Minister Eknath Shinde. Speaking at a meeting held Muktainagar on Tuesday,
Crime : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून वन्यजीवांच्या अवयवांची विक्री!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.