CM Shinde in Jalgaon : महापौरांचे मुख्यमंत्र्यांना 10 कलमी पत्र; जळगाववासीयांच्या समस्यांच्या तक्रारी

cm eknath shinde news
cm eknath shinde newsesakal
Updated on

Jalgaon News : ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी (ता. २७) जळगावला येत आहेत. महापौर जयश्री महाजन, मुख्यमंत्री शिंदे यांना जळगाववासीयांच्या समस्यांच्या तक्रारींचे दहा कलमी पत्रच देणार आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांना देण्यात येणाऱ्या पत्रात म्हटले आहे, की शहराचे काम करीत असताना, अनेक योजना शासन दरबारी प्रस्तावित आहेत. त्या प्रलंबित असल्यामुळे कामकाजात अनेक अडथळे येत आहेत. त्यामुळे या समस्यांच्या तक्रारी सोडवाव्यात, असे आवाहन पत्रात केले आहे.(CM Shinde in Jalgaon Mayor 10 point letter to Chief Minister Complaints about problems of Jalgaon residents Jalgaon News)

संकुलातील गाळेधारकांचा प्रश्‍न

शहरात महापालिकेच्या २८ व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा प्रश्‍न पंधरा वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे गाळेधारकांना सुविधा देण्यास अडचणी येत आहेत. त्यांचा प्रश्‍न प्राधान्याने सोडवावा.

हुडको संस्थेच्या ४७ कोटी कर्जाची हमी

हुडको संस्थेकडून घेतलेल्या कर्जाचे सेंटलमेंट करून महापालिकेला कर्जमुक्त केले आहे. मात्र, घेतलेल्या कर्जापोटी ४७ कोटी रुपये हमीदेय आहे. त्याबाबत शासनदरबारी पत्र दिले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

cm eknath shinde news
Bhiwandi News : काँग्रेसने दिला राष्ट्रवादीला मोठा झटका! भिंवडीत १८ नगरसेवक सहा वर्षांसाठी अपात्र

त्यामुळे हा प्रश्‍न सोडवून महापालिकेला कर्जमुक्त करावे, अशी मागणीही त्यांनी केली. शिवाय सेवाभरती नियमावली, अनुकंपा भरती, जळगाव विमानतळाचा प्रश्‍न, महापालिका कर्मचाऱ्यांच्या लेखापरीक्षणावरील आक्षेप काढणे, रोजंदारी कर्मचारी समायोजन करणे, महापालिकेत सनदी अधिकाऱ्यांच्या नेमणुका करणे, पश्‍चिम रेल्वे, मध्य रेल्वेमुळे बाधित झालेल्या आजूबाजूच्या परिसरात सुविधा पोचविणे, अमृत अभियानांतर्गत मलनि:स्सारण योजनेसाठी पंपिंग मशिनला वीजपुरवठा करणे आदी समस्यांबाबत विचार करून त्या त्वरित सोडवाव्यात, अशी मागणी महापौर महाजन यांनी पत्रात केली आहे.

cm eknath shinde news
Viral News: सत्तर फूट खोल विहीर अन् आईसह २७ पिल्लांना बाहेर काढण्याचा ४ तासाचा थरार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.