Ganeshotsav 2023 : सर्व गणेश मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव शांततेत साजरा करावा, दहाही दिवस विविध सामाजिक उपक्रमांवर भर द्यावा, रक्तदान शिबिर व सांस्कृतिक कार्यक्रम घ्यावेत. मतदानाबाबत जनजागृतीपर फलक लावावेत. विशेषत: कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोचणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बुधवारी (ता. १३) केले.
सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी, जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन यांची एकत्रित बैठक नियोजन भवनात झाली. त्या वेळी ते बोलत होते.
पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर जिल्हा दंडाधिकारी सोपान कासार, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, सार्वजनिक गणेश महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे व पदाधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व पालिकांचे मुख्याधिकारी या वेळी उपस्थित होते. (Collector Ayush Prasad appealed to Ganesh Mandals to follow rules strictly jalgaon news)
पोलिस अधीक्षकांनी गणेशोत्सव काळातील कायद्याबाबत माहिती दिली. शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले. श्री. नारळे यांनी गणेश मंडळांना येणाऱ्या अडचणी मांडल्या. सर्व परवानग्या एकाच ठिकाणी एकाच वेळी मिळाव्यात, शहरातील खड्डे बुजवावेत, विजेचा लपंडाव थांबवावा आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.
मंडप तपासणीसाठी न्यायालयाचे आदेश पाळावेत, सार्वजनिक स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा राखणे, गणेश विसर्जनाच्या दिवशी विसर्जन घाट, कृत्रिम तलावाच्या ठिकाणी निर्माल्य संकलनासाठी व्यवस्था करण्याच्याही सूचना या वेळी देण्यात आल्या.
नोडल अधिकारी नियुक्त
गणेश मंडळांना येणाऱ्या विविध अडचणी, परवानगीसाठीच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी अप्पर जिल्हा दंडाधिकारी सोपान कासार यांची नोडल अधिकारी म्हणून निवड करण्यात आली.
विसर्जन मिरवणूक रात्री बारापर्यंतच
दरम्यान, बैठकीनंतर पत्रकार परिषदेत माहिती देताना जिल्हाधिकारी प्रसाद व पोलिस अधीक्षक एम. राजकुमार म्हणाले, की गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीला रात्री बारापर्यंत परवानगी देण्यात येणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
जळगाव शहर व जिल्ह्यातही अनेक ठिकाणी मुस्लिम बांधवांनी ईदची मिरवणूक दुसऱ्या दिवशी अर्थात २९ सप्टेंबरला काढण्याचा निर्णय घेतला. समाजात तेढ निर्माण होईल, असे संदेश सोशल मीडियातून पसरवू नका, असे आवाहनही या वेळी करण्यात आले.
लम्पीमुळे गोठ्यातच पोळा
जनावरांमधील लम्पी आजारामुळे शेतकरी बांधवांनी गुरुवारी (ता. १४) गोठ्यातच पोळा साजरा करावा. बैल आजारी असेल, तर त्याला अंघोळ घालू नये. त्याला इतरत्र फिरवू नये. जनावरांना लसी दिल्या आहेत. मात्र, त्याचा परिणाम काही दिवसांनंतर कमी होतो. जळगाव शहरात दोन हजार ७०० जनावरांना लसीकरण झाले. काही बाकी आहे. ते आगामी दोन दिवसांत पूर्ण होईल, असेही या वेळी सांगण्यात आले.
दोन हजार ७८१ गणेश मंडळांद्वारे स्थापना
पोलिस अधीक्षक राजकुमार म्हणाले, की यंदा दोन हजार ७८१ गणेश मंडळांतर्फे गणेशमूर्तीची स्थापना होणार आहे. त्यात एक हजार ९३५ सार्वजनिक गणेश मंडळे आहेत.
प्रतिबंधात्मक कारवाई
गणेशोत्सवासाठी एसआरएफ, रॅपीड ॲक्शन फोर्स बोलाविण्यात आली आहे. तीस अतिरिक्त वाहनेही आहेत. ७०६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. अकरा जणांना तडीपार केले असून, ४०६ जणांना तात्पुरते तडीपार केले जाणार आहे. आणखी २४ जणांचा तडीपारीचा प्रस्ताव आहे. तर, १२ जणांवर एमपीडीए झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.